एक्स्प्लोर

Budget 2019 | आर्थिक पाहणी अहवाल बनवणारे कृष्णमूर्ती सुब्रमण्यन कोण आहेत?

यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रोफेसर कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी तयार केला आहे. मुख्य आर्थिक सल्लागाराचं प्रमुख काम हे परराष्ट्र व्यापार आणि औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावर धोरणात्मक सल्ला देणं असतं.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला. यंदा आर्थिक विकास दरात सात टक्क्यांनी वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच आर्थिक पाहणी अहवाल असून निर्मला सीतारमण उद्या अर्थसंकल्प सादर करतील. यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रोफेसर कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी तयार केला आहे. मुख्य आर्थिक सल्लागाराचं प्रमुख काम हे परराष्ट्र व्यापार आणि औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावर धोरणात्मक सल्ला देणं असतं. मुख्य आर्थिक सल्लागार अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. जाणून घेऊया देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांच्याबद्दल... कोण आहेत कृष्णमूर्ती सुब्रमण्यन? - 2018 च्या जुलै महिन्यात तत्कालिन सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी तडकाफडकी पद सोडलं, त्यानंतर कृष्णमूर्ती यांची नियुक्ती झाली. - ते देशाचे सतरावे मुख्य अर्थिक सल्लागार आहेत. - त्यांनी सादर केलेलं हे त्यांचं पहिलंच आर्थिक सर्वेक्षण. - सहसा अर्थ सारखा बोजड नीरस विषय, मोठं पद म्हटलं की डोळ्यासमोर कुणीतरी टक्कल पडलेला, चष्मा लागलेला, वयस्कर माणूस असेल अशी प्रतिमा येते - मात्र कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांचं वय फक्त 47 वर्ष आहे. प्रमुख आर्थिक सल्लागारपदी तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती झाली आहे. - हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिजनेसमध्ये ते प्राध्यापक होते, अॅनालिटिकल फायनान्स (analytical finance) हा विषय शिकवायचे. - आयआयटी कानपूरमधून पदवी, आयआयएम कोलकातामधून पदव्युत्तर शिक्षण तर अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिजनेसमधून एमबीए आणि पीएचडी मिळवली आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 साली केलेल्या ऐतिहासिक नोटाबंदीचं त्यांनी समर्थन केलं होतं. - बँकिंग, कार्पोरेट प्रशासन आणि आर्थिक धोरणांमधील तज्ज्ञ अशी त्यांची ख्याती आहे. - मोठमोठे अर्थतज्ज्ञ मोदी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत असतानाच या नव्या चेहऱ्याला नरेंद्र मोदींनी संधी दिली. - देशाच्या अर्थ व्यवस्थेभोवती साठलेले धुकं दूर करुन, आर्थिक विकास दराची गाडी वेगाने पुढे नेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Embed widget