Karnataka : कर्ज न दिल्याने रागात तरुणाने लावली चक्क बँकेला आग
Karnataka: बँकेने कर्ज न दिल्याच्या रागातून कर्नाटकातील एका व्यक्तीने चक्क बँकेला आग लावल्याची घटना घडली आहे.
Karnataka : कर्नाटकात एका व्यक्तीने कर्ज न मिळाल्याने चक्क बँकेला आग ( Karnataka Fire) लावली आहे, मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात (Haveri District) घडली आहे. आरोपी व्यक्तीने कर्जासाठी अन्क वेळा बँकेत अर्ज केला परंतु बँकेने हे अर्ज रद्द केले. अनेक वेळा अर्ज रद्द झाल्याने ही व्यक्ती नाराज होती. रविवारी लोन न मिळाल्याने चिंतेत असलेल्या या व्यक्तीने बँकेला आग लावली. सध्या या आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बँकेला आग लावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी व्यक्तीच्या विरोधात कगिनेली पोलिस (Kaginelli Police) स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर कलम (IPC) 436, 477 आणि 435 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व्यक्तीला कर्जाची गरज होती. त्यासाठी त्याने अनेक वेळा बँकेकडे अर्ज केले. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर देखील बँकेने कर्ज दिले नाही. त्यामुळे नाराज असलेल्या व्यक्तीने रविवारी बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बँकेला आग लावली
दरम्यान बँकेकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच कर्ज देण्यात येते. आरोपी व्यक्तीच्या अर्जात कमतरता असल्याने बँकेकडून कर्ज नाकारण्यात आले होते. कगिनली पोलिस स्थानकता गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची पोलिस तपासणी करत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका, बाधितांची संख्या 4 हजार 461 वर
- हापूस आंब्यावर निसर्गाची अवकृपा, अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात
- Trending News : बर्फाळलेल्या काश्मीरमध्ये भारतीय जवानांचा 'खुकुरी डान्स', व्हिडीओ व्हायरल
- Upcoming Movies and Web Series : 'मिर्झापूर सीझन 3' पासून 'गेहरियां'पर्यंत यावर्षी प्राइम व्हिडिओवर मनोरंजनाचा संपूर्ण डोस