एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Karnataka Government Formation : काँग्रेस हायकमांड इतकं दुर्बल कधीच नव्हतं, राज्यातले नेतेच हायकमांडला झुकवत करत आहेत दबावाचं राजकारण!

Karnataka Government Formation : काँग्रेसने कर्नाटकसारखं राज्य तर जिंकलं पण तरीही काँग्रेस हायकमांडला आपला गतकाळातला वचक अजूनही मिळवता येत नाही.

Karnataka Government Formation : काँग्रेसने (Congress) कर्नाटक तर जिंकलं पण मुख्यमंत्री कोण याचा पेच अजून संपलेला नाही. त्यातही मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार हे थेट हायकमांडला इशारे देणारी भाषा करताना दिसत आहेत. डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांची कालची वक्तव्येच ऐका....माझ्या नेतृत्वात 136 जागा जिंकल्या आहेत..एका माणसाचं धाडसही बहुमत बनवू शकतं..अशी वक्तव्ये काल डीके शिवकुमार यांनी करुन एकप्रकारे हायकमांडला आपल्या ताकदीला दुर्लक्षित न करण्याचाच इशारा दिला आहे. 

निकाल तर शनिवारी लागला, त्यानंतर काँग्रेसने दिल्लीतून निरीक्षकही पाठवले. आमदारांची मतंही जाणून घेतली, पण अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय करताना संतुलन साधण्याची किमया काँग्रेस हायकमांडला करावी लागणार आहे. 

काल सिद्धरामय्या दिल्लीत दाखल झाले, पण डी के शिवकुमार मात्र काल दिल्लीत पोहोचलेच नव्हते. काल त्यांचा वाढदिवसही होता, नंतर आजारपणाचं कारण देत त्यांनी बंगळुरुतच मुक्काम ठेवला. आज सकाळी ते दिल्लीत दाखल झाले. आता दिल्लीत बैठका झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्रिपदाचं नावं घोषित होण्याची शक्यता आहे. 

कर्नाटकच्या निमित्ताने पुन्हा एक बाब स्पष्ट होतेय ती म्हणजे काँग्रेस हायकमांड कधी नव्हे इतकं दुर्बल झालं आहे. 

काँग्रेस हायकमांड नेत्यांपुढे हतबल होतेय का?

  • गेल्या काही दिवसांत काँग्रेसमध्ये हायकमांडला झुकवत, ब्लॅकमेल करण्याचा एक पॅटर्नच पडत चालला आहे.
  • राजस्थानात अशोक गहलोत यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित होत होतं, पण काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिल्लीत येण्याऐवजी त्यांनी राजस्थानात राहणंच पसंत केलं. त्यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामानाट्यही घडवलं
  • सध्या सचिन पायलट हे काँग्रेसचे नेते राजस्थानात काँग्रेसच्याच सरकारला इशारे देत आंदोलन करत आहेत. वसुंधरा राजे यांच्या आरोपांबाबत गहलोत इतके मवाळ का असा आरोप करत त्यांनी उघडपणे 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे.
  • महाराष्ट्रातही विधानपरिषदेत तांबे-थोरात कुटुंबाने खेळ करत पक्षाला बाजूला ठेवत शेवटी अपक्षच उमेदवारी दाखल केली. या सगळ्या प्रकारानंतरही कुठली कडक कारवाई होताना दिसलेली नाही.
  • देशात 4 राज्यांमध्ये आता काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकच्या विजयाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 2024 साठी रसद उपलब्ध करुन देणारं राज्य दिलं आहे. पण हायकमांड मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:च्या मर्जीचा निर्णय घेणार की दबावाला पळी पडणार हेही पाहणं महत्वाचं असेल. 

कर्नाटकमध्ये कोणता फॉर्म्युला वापरणार?

मुख्यमंत्रीपदाच्या निवडीवरुन राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीनही राज्यांमधे काँग्रेसने घोळ करुन ठेवले. त्यात मध्य प्रदेश तर हातचं गेलं. राजस्थानमध्ये पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं तर छत्तीसगडमध्ये टी ए सिंह देव यांना अडीच अडीच वर्षांचा वादा करण्यात आला होता. पण तरीही दोन्ही राज्यांत अंतर्गत नाराजी लपून राहिली नाही. आता कर्नाटकमध्ये नेमका कुठला फॉर्म्युला वापरला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Embed widget