एक्स्प्लोर
खरे किंगमेकर तर कर्नाटकचे राज्यपालच!
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट
कर्नाटक विधानसभा निवडणूक - बंगळुरु: कर्नाटकमधील सत्तासंघर्षात नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांच्या अवधीची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि जेडीएस यांनीही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. अशा परिस्थितीत कर्नाटकचे राज्यपालच खरे किंगमेकर ठरणार आहेत.
भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं भाजपनं दावा केला असला तरी, काँग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे कुमारस्वामीही सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. मात्र आता राज्यपाल वजूभाई वाला काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत वजूभाई वाला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना वजूभाई वाला गुजरातचं अर्थ मंत्रालय सांभाळत होते. मोदींच्या 13 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात वजूभाईंकडे नऊ वर्ष अर्थ मंत्रालयाची जबाबदारी होती. 2005-06 या काळात वाला हे गुजरातमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.
राज्याचा अर्थसंकल्प 18 वेळा सादर करण्याचा विक्रम रचणारे 80 वर्षीय वजूभाई एकमेव अर्थमंत्री आहेत. गुजरातमध्ये सत्तांतर झाल्यानंतरही (केशूभाई पटेल ते नरेंद्र मोदी) अस्तित्वात राहिलेल्या मोजक्या नेत्यांपैकी वजूभाई वाला एक आहेत. 2001 मध्ये मोदींच्या पहिल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी वाला यांनी राजकोटची जागा सोडली होती.
वजूभाई वाला राजकोटच्या एका व्यापारी कुटुंबातील आहेत. शालेय जीवनातच ते संघात सहभागी झाले होते. 26 व्या वर्षी वजूभाईंनी जनसंघात प्रवेश केला. केशूभाईंचे ते निकटवर्तीय होते. राजकोटचं महापौरपदही वजूभाईंनी भूषवलं होतं.
1985 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल केला होता. या जागेवरुन त्यांनी तब्बल सात वेळा विजय मिळवला. राजकोटमधील मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क असल्यामुळे वजूभाईंची रिअल इस्टेट संपत्ती वाढल्याचा आरोप त्यांच्यावर होत राहिला, मात्र वजूभाईंनी त्याचा फारसा प्रभाव पडू दिला नाही.
आपल्या मजेदार भाषणांसाठी वजूभाई प्रसिद्ध आहेत. गर्दीला आकर्षित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वजूभाई वाला त्यांच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेचा विषयही ठरले होते. कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी फॅशनपासून दूर राहावं, असा सल्ला दिल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
संबंधित बातम्या
स्पेशल रिपोर्ट : कर्नाटकातील सर्वात लक्षवेधी ‘बदामी’ची लढाई
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो : राज ठाकरे
राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री
कर्नाटक 'काँग्रेसमुक्त', देशातील 21 व्या राज्यातही कमळ फुललं
कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं!
बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : 18 जागांचे निकाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement