Kangana Ranaut Statement : कंगना रनौतचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या; संजय राऊतांची मागणी
अभिनेत्री Kangana Ranaut तिच्या वेगवेगळ्या विषयांवरील वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगनाच्या या स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut ) तिच्या वेगवेगळ्या विषयांवरील वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतच कंगनाने ‘1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं’, असं वक्तव्य वृतवाहिनीच्या कार्यक्रमात केलं. कंगनाच्या या स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कंगनाचं ते वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तसंच कंगनाला देण्यात आलेले राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणीही राऊतांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, 'सलमान खुर्शीद हे सुद्धा पुरुषी वेषातले कंगनाबेनच आहेत. अशा प्रकारची वक्तव्यं करुन हे विद्वान म्हणवणारे लोक राहुल गांधींना (Rahul Ghandhi) आणि काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम करतात. कंगनाच्या (Kangana Ranaut ) वक्तव्याने जसा देशाचा अपमान झाला तसाच या वक्तव्यानेही देशाचा अपमान झाला आहे. पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी खरंतर भाजपनेच करायला हवी.' पुढे राऊत म्हणाले, 'जो पर्यंत कंगनाचे पुरस्कार मागे घेत नाहीत. तोपर्यंत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा अधिकार सरकारला नाही. ही संपूर्ण देशाची मागणी आहे'
काय म्हणाली कंगना?
एका मुलाखतीत कंगना रनौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, 'स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं.'
Kangana Ranaut : 1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं, कंगना रनौत बरळली!
कंगनाच्या (Kangana Ranaut ) वक्तव्याबद्दल वरुण गांधी यांनी देखील ट्वीट करत कंगनावर निशाणा साधला होता. ‘कधी महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या खुन्याचा सन्मान. आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारांना वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’ असं वरूण गांधी यांनी ट्वीटमध्ये लिहीले होते.
'असा विचार म्हणजे मूर्खपणा की देशद्रोह...' वरुण गांधींचा कंगनाला टोला, तर कंगना म्हणाली...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
