(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मध्य प्रदेशात 'ऑपरेशन लोटस'मुळे कमलनाथ सरकार धोक्यात, काँग्रेसच्या 6 मंत्र्यांसह 17 आमदार कर्नाटकात
भाजपनं काँग्रेसला खिंडार पाडल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर थेट भोपाळ गाठलं आहे. विशेष म्हणजे 15 मार्चपासून मध्यप्रदेश विधानसभेचं अधिवेशन सुरु होतंय.
नवी दिल्ली :कर्नाटकप्रमाणेच काँग्रेसच्या हातातून मध्यप्रदेशची सत्ता खेचण्यासाठी भाजपनं कमलनाथ सरकारचे मंत्री आणि आमदार फोडायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशातल्या कमलनाथ यांच्या सरकारमधल्या 6 मंत्र्यांसह 17 आमदारांनी काँग्रेसला दणका देत बंगळुरु गाठलं आहे. या आमदारांना विशेष विमानानं बंगळुरुमध्ये आणण्यात आलं आहे. भाजपनं काँग्रेसला खिंडार पाडल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर थेट भोपाळ गाठलं आहे. विशेष म्हणजे 15 मार्चपासून मध्यप्रदेश विधानसभेचं अधिवेशन सुरु होतंय. आणि अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या हरदीप सिंग डंग या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा देखील सोपवला आहे.
याशिवाय 3 चार्टर प्लेनच्या सहाय्याने दिल्लीतून बंगळूरू येथे राजवर्धन सिंग, ओपीएस भदोरिया, गिरीराज दंडोतिया, बिजेंद्र यादव, जसपाल जज्जी, रणवीर जाटव, कमलेश जाटव, जसवंत जाटव, रक्षा सिरोनिया, मुन्ना लाल गोयल, सुरेश धाकड, रघुराज कसाना, हरदीपसिंग डांग दिसले.
Kamalnath Government | मध्य प्रदेशात भाजपचं ऑपरेशन 'कमल'नाथ! 17 आमदार फोडले
या आमदारांपैकी हरदीप सिंग डंग यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामादेखील पाठविला आहे. बीसाऊ लालसिंग हे देखील काल बंगळूरहून भोपाळला आले आहे. परंतु भाजप सूत्रांचे म्हणणे आहे की, बिसाऊ लालसिंगही त्यांच्यासोबत आहेत आणि गरज भासल्यास ते भाजपबरोबर उभे राहतील या आश्वासनानंतर ते भोपाळला रवाना झाले आहेत.
16 मार्चपासून सुरू होणार्या मध्य प्रदेश विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप कमलनाथ सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार आहे. या आमदारांच्या मदतीने अविश्वास ठराव मंजूर करून कमलनाथ सरकार बरखास्त करणार आहे.
संबंधित बातम्या :
कर्नाटकमध्ये भाजपला झटका, ऑपरेशन लोटस फेल
'ऑपरेशन लोटस' विरुद्ध 'ऑपरेशन धनुष्यबाण', नाराजांना हाताशी धरुन भाजपचा नवा प्लॅन?
कमलनाथ सरकारचं अजब फर्मान; कमीत कमी एका व्यक्तीची नसबंदी करण्याचे आदेश