Kaali Controversy : ...तर तो नुपूर शर्मा, महुआ मोईत्रा यांच्या विचारांचा आदर करेल, तस्लिमा नसरीन म्हणतात...
Kaali Controversy : बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन म्हणतात, जर एखाद्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास नसेल, तर ही दोन्ही विधाने तुम्हाला चुकीची वाटतील.

Kaali Controversy : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी 'काली' वाद आणि नुपूर शर्मा यांच्यावर झालेल्या वादावर मत व्यक्त करताना म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास असेल तर तो नुपूर शर्मा आणि महुआ मोईत्रा यांच्या विचारांचा आदर करेल. त्याच वेळी, जर एखाद्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास नसेल, तर दिलेली दोन्ही विधाने तुम्हाला चुकीची वाटतील.
If you believe in freedom of expression, you would support both Sharma's and Moitra's right to express their views. If you do not believe in freedom of expression, you would support neither's right or either Sharma's or Moitra's right to express their views.
— taslima nasreen (@taslimanasreen) July 6, 2022
दोघींच्या विधानानंतर देशभरात खळबळ उडाली होती
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटले होते की, काली देवीला मांस आवडते आणि ती दारू स्वीकारते. त्याचवेळी नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केली होती, त्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. तस्लिमा नसरीन पुढे म्हणाल्या की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिंसक नसते. एखाद्याचा शिरच्छेद करून बक्षीस जाहीर करणे, याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणू शकत नाही. एखाद्याच्या विचारांचा आदर करणे आणि मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा आदर करणे. समर्थन करणे पूर्णपणे वेगळे आहे."
अनेक तक्रारी दाखल
महुआ मोईत्रा यांनी देवी कालीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, तर भाजपने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. काली या माहितीपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला होता, ज्यात देवी कालीच्या रूपात एक स्त्री धूम्रपान करताना दिसली होती. त्याच वेळी, तृणमूल काँग्रेसने महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यापासून संबंध नसल्याचे सांगितले आणि या प्रकरणाचे संपूर्ण राजकीय युद्धात रूपांतर झाले. दरम्यान, बुधवारी मोईत्रा यांनी ट्विटरवर पार्टीला अनफॉलो केले होते.
माझ्यासाठी काली म्हणजे मांस प्रेमी आणि मद्य स्वीकारणारी देवी - महुआ मोईत्रा
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हटले, 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरवर बोलताना सांगितले, "कालीची अनेक रूपे आहेत. माझ्यासाठी काली म्हणजे मांसप्रेमी आणि दारू स्वीकारणारी देवी आहे. लोकांची मते भिन्न आहेत, मला त्यात काही अडचण नाही."























