एक्स्प्लोर

न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार!

शिक्षेच्या सुनावणीसाठी रोहतक तुरुंगातच सोमवारी कोर्ट रुम तयार करण्यात येणार आहे. सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांना हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात आणलं जाणार आहे.

चंदीगड : बलात्कार प्रकरणातील आरोपी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावण्यासाठी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश रोहतक तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत. राम रहीमला सोमवारी कोर्टात नेण्याऐवजी न्यायाधीशच आता तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत. राम रहीम साध्वीवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर हरियाणात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. राम रहीमच्या समर्थकांनी कायदा हातात घेत जाळपोळ केली आणि मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केलं. या हिंसाचारात 31 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिक्षेच्या सुनावणीसाठी रोहतक तुरुंगातच सोमवारी कोर्ट रुम तयार करण्यात येणार आहे. सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांना हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात आणलं जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती. डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं. जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी साध्वींचंही लैंगिक शोष झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही. ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. 2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले. जुलै 2016 :  खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते. जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली. 25 जुलै 2017 :  सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकडून लवकरच निकाल लावता येईल. 17 ऑगस्त 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली.
संबंधित बातम्या राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख? व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात? कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
Pradnya Satav: प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Dhurandhar Hit Or Flop On Box Office: अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Embed widget