एक्स्प्लोर
जेएनयूत एमफीलच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नवी दिल्ली : दिल्लीतील जेनएयू विद्यापीठात एमफीलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अति तणावामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. मुतुकृष्णन असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
मुतुकृष्णन हा हैदराबाद विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. 27 वर्षीय मुतुकृष्णन मित्राकडे जेवायला आला होता. मित्राच्याच खोलीत तो झोपायला गेला. त्याने खोलीत स्वतःला बंद करून घेतलं आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. मुतुकृष्णनच्या मित्राने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र मुतुकृष्णनचा फोन बंद होता.
अति तणावामुळे मुतुकृष्णनने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.मात्र पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement