(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coal Mine Collapse: झारखंडमध्ये बेकायदेशीर कोळसा खाणीदरम्यान मोठी दुर्घटना; अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
Jharkhand News: झारखंडमधील धनबाद येथे एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील धनबादजवळील अवैध कोळसा खाणकामादरम्यान गुरुवारी जमीन कोसळली.
Jharkhand News: झारखंडमधील धनबाद येथे एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील धनबादजवळील अवैध कोळसा खाणकामादरम्यान गुरुवारी जमीन कोसळली. झारखंडमधील धनबादमध्ये अवैध कोळसा खाणकाम सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या खाणीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी झारखंडमध्ये कोळसा खाण कोसळल्याने अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना घडली तेव्हा कोळशाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू होते, असं म्हटलं जात आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यातही झाला होता अपघात
या वर्षी फेब्रुवारीमध्येही धनबादमध्ये बेकायदेशीर कोळसा खाण कोसळून अनेक कामगारांचा मृत्यू झाला होता. तीन बंद कोळसा खाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन सुरु असताना त्या अचानक कोसळल्या. या घटनेत चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. धनबादच्या गोपीनाथपूर भागातील ईस्टर्न कोलफिल्ड्सच्या ओपन कास्ट माइनमध्ये ही घटना घडली.
नोव्हेंबरमध्ये बोकारो येथील कोळसा खाणीत चार जण अडकले होते
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात कोळसा खाणीत चार जण अडकले होते. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
हे देखील वाचा-
- Amit Shah: देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर डेटाबेस करण्याचं काम सुरु: अमित शाह
- Bulldozer History: घर पाडण्यासाठी नव्हे तर वेगळ्याच कामासाठी बुलडोझऱचा शोध; जाणून घ्या इतिहास
- National Civil Service Day 2022: आज राष्ट्रीय लोक सेवा दिवस! इतिहास आणि इतर महत्वाची माहिती घ्या जाणून
- Nashik MHADA : नाशिकमध्ये म्हाडाची लॉटरी; कधी आणि किती घरांसाठी? मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून महत्वाची माहिती
- Raju Shetti : ज्यांनी 800 शेतकऱ्यांचे बळी घेतले त्यांच्यासोबत कसे जाणार, राजू शेट्टींचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा
- Dadaji Bhuse : कृषीमंत्र्यांनी गाड्याचा ताफा थांबवत शेतकऱ्यांशी साधला संवाद, शेतमाल स्वतः च विकण्याचं केलं आवाहन