एक्स्प्लोर
Advertisement
सिमेंट क्षेत्रातील अग्रगण्य जेपी ग्रुपचं 4460 कोटींचं कर्ज थकित
नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्यानंतर बँकांची गलेलठ्ठ कर्ज बुडवणाऱ्यांमध्ये आणखी एक नाव पुढे आलंय. हे नाव आहे जेपी ग्रुपचं. जेपी ग्रुप सिमेंट, वीज, पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रातील मोठं नाव आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीमुसार, जेपी ग्रुपने बँकाचं 4460 कोटी रूपयाचं कर्ज थकवलं आहे.
या 4460 कोटी रूपयांच्या रकमेत 2905 रूपयाचं मुद्दल आणि 1558 रूपयाचं व्याज यांचा समावेश आहे.
देशभरातील विविध बँकाच्या जेपी ग्रुपकडे असलेल्या थकबाकीत जयप्रकाश असोसिएट्सकडे 2183 कोटी रूपये, जयप्रकाश पॉवर वेंचर्सकडे 688 तर जेपी सिमेंटकडे 34 कोटी रूपये थकले आहेत.
जेपी ग्रुपच्या या तीनही बड्या थकबाकीदारांकडे असलेली कर्जाची रक्कमही मोठी आहे. त्यामध्ये सर्वात मोठ्या जेपी असोसिएट्सकडे 837 कोटी रूपये, जयप्रकाश पॉवर 152 कोटी आणि जेपी सिमेंटने 63 कोटी रूपये या रकमांचा समावेश आहे.
जेपी समूहातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या जेपी असोसिएट्सला 2015-2016 या आर्थिक वर्षात मोठा तोटा झालाय.
जेपी समूहातील अन्य कंपन्यांकडेही बँकाची कोट्यवधी रूपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये जेपी इन्फ्राटेक 193 कोटी, जेपी आग्रा विकास लिमिडेट 3 कोटी आणि प्रयागराज पॉवर 308 कोटी रूपयाचं व्याज थकलेलं आहे.
जेपी असोसिएट्सला 2015-16 या आर्थिक वर्षात एकूण 3345 कोटी रूपयांचा तोटा झालाय. तर त्यापूर्वीच्या म्हणजे 2014-2015 या आर्थिक वर्षात 1735 कोटी रूपयांचा तोटा झाला होता.
बँकाचे कोट्यवधी रूपये थकवणाऱ्या या बड्या उद्योगसमूहाविरोधात सरकार किंवा बँका काय कारवाई करतात, हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement