एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ड्रग्जची इंजेक्शन, बोटं तुटली, पाक जेलमध्ये चंदूवर अत्याचार

नवी दिल्ली: नजरचुकीनं सीमारेषा ओलांडून पाकच्या हद्दीत शिरलेल्या चंदू चव्हाणवर पाकिस्तान लष्करानं अनन्वित अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. चंदूला वारंवार बेदम मारहाण केली जायची. तसंच त्याला सातत्यानं ड्रग्जची इंजेक्शन दिली जात होती. अशी धक्कादायक माहिती चंदूचा भाऊ भूषण चव्हाणनं दिली आहे. कैदेत असताना चंदूला पुरेसं अन्नही दिलं जात नसल्याचं चंदूच्या भावानं सांगितलं आहे. तब्बल 4 महिन्यांनी भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्ताननं चंदूची सुटका केली होती. सध्या चंदूवर अमृतसरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी कुटुंबीयांच्या भेटीत चंदूनं पाकच्या अत्याचाराची माहिती दिल्याचं भूषण चव्हाणानं म्हटलं आहे. भूषण म्हणाला की, 'अटक केल्यापासून चंदूला अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. चंदूनं अटक झाल्यानंतर 21 जानेवारीला पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला. त्याला वारंवार मारहाण केली जात होती. तसेच त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून पाकिस्तानी लष्कर त्याला एका कॅम्पमधून दुसऱ्या कॅम्पमध्ये नेत होते. चंदूची बोटं तुटली असून त्याच्या गुडघ्यालाही मार लागला आहे.' 'या सर्व प्रकारामुळे चंदू थोडासा खचला आहे. पण काहीच दिवसात तो ठीक होईल.' अशी माहिती चंदूच्या आजोबांनी दिली. कोण आहेत चंदू चव्हाण? चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे. तो जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 29 सप्टेबरला चंदूने चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं. चंदू चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानकडून भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका
भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली
जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच!
22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं
पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा
धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget