Karnataka Politics : 'पंडित नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान नाहीत, तर...', भाजप आमदाराच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं
BJP MLA Basangouda Patil : भाजप आमदार बासनगौडा पाटील यत्नाल पु्न्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नेहरुंबाबतच्या त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Karnataka Politics : भाजप आमदाराने (BJP MLA) पंडित जवाहलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू नाहीत, असं वक्तव्य आता भाजप आमदार बासनगौडा पाटील यत्नाल (Basangouda Patil Yatnal) यांनी केलं आहे. कर्नाटकमधील (Karnataka) भाजप आमदार (BJP MLA) बासनगौडा पाटील यत्नाल नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे (Former Prime Minister of India) चर्चेत असतात. त्यांच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू नव्हते, नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) देशाचे पहिले पंतप्रधान होते', असं वक्तव्य बासनगौडा पाटील यत्नाल यांनी केलं आहे.
'पंडित नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान नव्हते, तर...'
कर्नाटकमधील भाजप आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, ''सर्वांना वाटत की, पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण, असं नाही. सुभाषचंद्र बोस पहिले पंतप्रधान होते.'' सुभाषचंद्र बोस यांनीच इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडलं. त्यांच्या भीतीमुळे इंग्रज देश सोडून गेले, असंही गौडा यांनी म्हटलं आहे.
'सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळालं'
कर्नाटकातील एका जाहीर सभेला संबोधित करताना बसनगौडा पाटील म्हणाले की, ''बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, उपोषणामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही. तर, तुम्ही एका कानाखाली मारली तर आम्ही दुसऱ्या गाल पुढे करु, असं केल्यामुळे स्वातंत्र्य मिळालं होतं. सुभाषचंद्र बोस यांच्या भीतीमुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.''
'सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान'
त्यांनी पुढे म्हटलं की, ''दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी भारत सोडला होता. त्यावेळी देशाच्या काही भागात स्वातंत्र्य घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचे स्वतःचे चलन, ध्वज आणि राष्ट्रगीत होते. यामुळेच पंतप्रधान मोदींनीही देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू नसून नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याचं म्हटलं आहे.'' असंही गौडा यांनी म्हटलं आहे.
बसनागौडा पाटील वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत
बसनागौडा पाटील कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखले जातात आणि यामुळे नेहमी चर्चेतही असतात. ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी काँग्रेस सरकारबाबतच वक्तव्य केलं होतं. कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार सहा ते सात महिन्यांत पडेल, असं गौडा म्हणाले होते. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता.
महत्वाच्या इतर बातम्या :