एक्स्प्लोर
नोटाबंदीमुळे काश्मीरमधील हिंसाचारात 60 टक्क्यांनी घट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाने दहशतवादाचं कंबरडं मोडण्यास चांगलीच मदत झाली आहे. नोटाबंदीमुळे जम्मू काश्मीरमधील हिंसाचारात 60 टक्के घट झाली असून हवाला व्यवहारही 50 टक्क्यांनी घटला असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिला आहे.
दहशतवादी कारवायांसाठी बनावट नोटा वापरल्या जातात. या नोटा पाकिस्तानातील क्वेट्टा आणि कराची येथे छापल्या जात असल्याचा सरकारला संशय आहे. नोटाबंदीमुळे हवाला व्यवहारात घट झाली असून त्याचा परिणाम जम्मू काश्मीरमधील दगडफेकीचे प्रमाण घटण्यात झाला आहे.
दगडफेक करणाऱ्यांना पैसे देण्यावरही नोटाबंदीने चाप बसला असल्याचं गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे. गेल्या दोन महिन्यात काश्मीरमध्ये डिसेंबरमध्ये केवळ एक स्फोट झाला. ती घटना सोडली तर अन्य दहशतवादी घटना घडल्या नाहीत, असं गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
नोटाबंदीचा परिणाम केवळ दगडफेकीवरच नाही, तर दहशतवाद्यांना थेट पैसे पुरवणाऱ्यांवरही झाला आहे. पैसे पुरवणारे दहशतवाद्यांना तातडीने रोख स्वरूपात पैसे पुरवतात. नोटाबंदीने हे नेटवर्क कमकुवत झालं आहे.
गेल्या काही आठवड्यात काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादविरोधी मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात आल्या, असं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलंय. तसंच जम्मू काश्मीरमध्ये भ्रष्ट मार्गाने रिअल इस्टेटचे व्यवहार करणाऱ्यांचंही कंबरडं मोडलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement