एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरात शोपियानमधील मिनी सचिवालयावर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमधील 'मिनी सचिवालय' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशासकीय इमारतीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरातील शोपियानमधील मिनी सचिवालयावर आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत फायरिंग केली. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला.

मिनी सचिवालयातून पळ काढल्यानंतर दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसराचा लपण्यासाठी आसरा घेतला. त्यानंतर जादा फोर्स मागवत त्या संपूर्ण परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी तपास अभियान सुरु केलं आहे. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली नाही. तसेच आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचीही माहितीही मिळालेली नाही. गोळीबार झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे.

CICA बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे भारताने पाकिस्तानला सुनावलं

काश्मीरमधून दररोज सीमाभागांत सीजफायरचं उल्लंघन किंवा दहशतवादी हल्ल्याचं वृत्त समोर येत आहे. याचदरम्यान, भारताने सीआयसीएच्या डिजिटल बैठकीत काश्मीर मुद्द्या उपस्थित केल्यामुळे गुरुवारी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. तसेच इस्लामाबादला 'थेट आणि अप्रत्यक्ष' सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करण्याचा सल्ला देण्यात आला. या मुद्द्यावर पाकिस्तानवर निशाणा साधत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, पाकिस्तानने आणखी एका मंचाचा उपयोग भारताबाबत आपले चुकीचे विचार व्यक्त करण्यासाठी केला आहे.

पाकिस्तानने आशियातील सहभाग आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या उपाययोजनांसाठी असलेल्या परिषदेच्या मंत्रीमंडळ बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. सीआयसीए 27 देशांचा आंतरराज्यीय मंच आहे. या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी केलं.

दरम्यान, विदेश मंत्रालयाने आपल्या वक्तव्यात म्हटलं की, भारताच्या अंतर्गत बाबींविषयी भाष्य करण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही. तसेच पुढे बोलताना मंत्रालयाने स्पष्ट केलं की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरीABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget