दहशतवादी बनलेल्या पत्रकाराचा सुरक्षा दलांकडून खात्मा; श्रीनगरमधील घटना
पूर्वी पत्रकार असलेल्या आणि नंतर दहशतवादी बनलेल्या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे.
![दहशतवादी बनलेल्या पत्रकाराचा सुरक्षा दलांकडून खात्मा; श्रीनगरमधील घटना Jammu and Kashmir Journalist turned terrorist among two killed in Srinagar encounter दहशतवादी बनलेल्या पत्रकाराचा सुरक्षा दलांकडून खात्मा; श्रीनगरमधील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/30/f09ff8b5ddc8bf9cde5767de5bb22c5e_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर: पूर्वी पत्रकारिता करणाऱ्या आणि नंतर दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या एका दहशतवाद्याला लष्कराने कंठस्नान घातलं आहे. रईस अहमद भट असं या दहशतवाद्याचं नाव असून तो 'व्हॅली न्यूज सर्व्हिस' या नावाचं वेब पोर्टल चालवत होता. तो नंतर लष्कर ए तोय्यबा ही दहशतवादी संघटनेसाठी काम करु लागला होता अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. जम्मू पोलिसांच्या दहशतवाद्यांच्या 'क' श्रेणीत रईस भटचे नाव असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
रईस अहमद भट याने आपल्या पत्रकारितेचा वापर हा दहशतवादी कृत्यांसाठी केला. त्या माध्यमातून त्याने अनेक दहशतवादी कृत्यांना खतपाणी घातल्याचं स्पष्ट झालंय असं काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं. रईस अहमद भटवर या आधी दोन गुन्हे नोंद असल्याची माहितीही त्यांनी दिली.
#SrinagarEncounterUpdate: Killed terrorist (Rayees Ah Bhat) was earlier a journalist &was running online news portal 'ValleyNews Service' in Anantnag. Joined terrorist ranks in 8/2021 &was categorised 'C' in our list. 02 FIRs are already registered against him for terror crimes. https://t.co/60J86npozf
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) March 30, 2022
सुरक्षा दलांच्या या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये हिलाल अहमत रहम असं दुसऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. राज्यातील अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये या दोन दहशतवाद्यांचा समावेश आहे. या दोन दहशतवाद्यांना मारल्यानंतर या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Pune Cylinder Blast : पुण्यात गॅस विक्रीचा मुद्दा ऐरणीवर, 25 सिलेंडरचे स्फोट झाल्यानंतर तब्बल 198 अवैध सिलेंडर जप्त
- DA Hike : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला
- Jalna News Exclusive : निलंबित करु, आयकर विभागाकरवी धाड टाकू, आ. बबनराव लोणीकरांची महावितरण कर्मचाऱ्याला धमकी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)