एक्स्प्लोर

DA Hike : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला

7th Pay Commission DA Hike : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आता तीन टक्क्यांची वाढ होऊन तो 31 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

मुंबई : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता राज्यांनेही त्याचं अनुकरण केलं आहे. राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना आता तीन टक्के अधिक महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जुलै, 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरु तो 31 टक्क्यांवर नेला आहे. 

राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली असून तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महागाई भत्ता वाढ 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपध्दती आहेत त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

दरम्यान, केंद्राने महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता राज्य सरकार हा निर्णय कधी घेतंय याची उत्सुकता राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लागली होती. आज हा निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ
दरम्यान  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी ते जून 2022 पर्यंतसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 48 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. 

देशातील वाढती महागाई लक्षात घेता केंद्राने आणि राज्याने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे. मग या महागाईची झळ बसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे काय असाही प्रश्न व्यक्त केला जात आहे. 

महागाई भत्त्याची सुरुवात कधी? 
वाढती महागाई लक्षात घेता राहणीमानाचा स्तर कायम राखण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. देशात सर्वप्रथम, मुंबईमध्ये 1972 साली महागाई भत्ता देण्यात आला. त्यानंतर त्याचे अनुकरण केंद्र सरकारने करत केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 

ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Aditi Tatkare: रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Jayant Patil on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका; म्हणाले, 'लोकशाही मार्गाने...'
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका; म्हणाले, 'लोकशाही मार्गाने...'

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Crime News: सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
Embed widget