एक्स्प्लोर

Pune Cylinder Blast : पुण्यात गॅस विक्रीचा मुद्दा ऐरणीवर, 25 सिलेंडरचे स्फोट झाल्यानंतर तब्बल 198 अवैध सिलेंडर जप्त   

एकामागोमाग एक झालेल्या या स्फोटानंतर गॅस विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Pune Cylinder Blast : पुण्यातील कात्रज भागात अवैधरित्या साठा करण्यात आलेल्या 25 गॅस सिलेंडरचे काल स्फोट झाले. यामुळे गॅस एजन्सीजच्या साहाय्याने काळ्या बाजारात होणाऱ्या गॅस विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पुरवठा विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे गेल्या काही दिवसांमधे तब्बल 198 अवैध सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.

 तब्बल 198 गॅस सिलेंडर जप्त

काल एकामागोमाग एक झालेल्या या स्फोटांनी पुण्यातील कात्रजच्या टेकडीचा परिसर हादरून गेला.  एका पत्र्याच्या शेडमधे साठवून ठेवण्यात आलेल्या गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला आणि गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठवणूक कशी केली जातेय हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं. पण अशाप्रकारे घरघुती वापराच्या गॅसची साठवणूक करण्याची ही एकमेव घटना नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधे मिळून आठ अवैध साठ्यांवर कारवाई करुन 198 गॅस सिलेंडर जप्त केलेत. 

गॅस एजन्सीजच्या सहभागाशिवाय अशक्य

गॅसचा हा काळा बाजार गॅस एजन्सीजच्या सहभागाशिवाय अशक्य असल्याच जाणकारांच म्हणणं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे घरगुती वापराच्या गॅसच्या पुरवठ्यासाठी 118 गॅस एजन्सीज आहेत. मात्र या गॅस एजन्सीजकडून वितरीत होणारे सिलेंडर अधिकृत गॅस धारकांपर्यंत पोहचत नसल्याच दिसून येतय. या काळ्या बाजारात गॅस एजन्सीज बरोबर पोलीस देखील सहभागी असण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. कारण कात्रजमधे जिथे हे स्फोट झाले, तिथे अनेकदा पोलीस तपासणीसाठी येत असल्याचं समोर आलं होतं, मात्र त्यांनी प्रत्यक्षात काहीच न केल्याच स्थानिकांच म्हणणं आहे.  

काळ्याबाजाराला पोलीस आणि पुरवठा विभागाकडून चाप लावण्याची गरज 

अनेकदा घरघुती वापराच्या गॅस सिलिंडरमधुन गॅस काढून ते छोट्या सिलेंडरमध्ये भरुन ते विकण्याचे प्रकारही घडतायत. मात्र असं करणं जीवावर बेतु शकतं. कात्रज मधील या स्फोटांमधे सुदैवाने कोणती जीवीतहानी झाली नाही. मात्र भविष्यातील हानी रोखायची असेल तर गॅस एजन्सीजच्या सहाय्याने चालणाऱ्या या काळ्याबाजाराला पोलीस आणि पुरवठा विभागाकडून चाप लावण्याची गरज आहे. गॅस सिलेंडरच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचं प्रमाणही वाढताना दिसतंय. मात्र हा काळाबाजार तो करणाऱ्यांच्या आणि इतरांच्याही जीवावर बेतण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. तो रोखण्याची जबाबदारी जशी पुरवठा विभाग आणि पोलीसांची आहे, तसेच सामान्य लोकांनीही याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. 

लोकांमध्ये भीतीचे वातावरण

कात्रजमध्ये काल अचानक गॅस सिलिंडरच्या स्फोटाचे आवाज ऐकू आले. स्फोट झाला त्यावेळी बाहेर लहान मुले खेळत होती. त्यामुळे एकच धावपळ झाली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरातील घरावरील पत्रे उडाले. गाड्या जळून खाक झाल्या. परिस्थितीचे गांभिर्य पाहून परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. परिसरामध्ये रस्ते खूप अरूंद आहेत. त्यामुळे अग्निशामन दलाच्या गाड्यांना पोहचण्यास उशीरा पोहचल्या. सध्या आग आटोक्यात आल्याचे अग्निशामन दलाकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी सहा अग्निशामन दलाच्या गाड्या आणि चार पाण्याचे बंब होते. सध्या आग आटोक्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Pune : कात्रजमध्ये 10 ते 12 गॅस सिलेंडरचा स्फोट, 100 सिलेंडरचा अनधिकृत साठा

DA Hike : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget