Delhi : जहांगीरपुरी भागात अवैध बांधकामांवर बुल्डोझर, हिंसाचारानंतर कठोर तोडक कारवाईचा निर्णय
Jahangirpuri Demolition : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. दिल्ली महापालिकेने बुल्डोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.
Jahangirpuri Demolition : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. दिल्ली महानगरपालिकेने (MCD) बुल्डोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. एच ब्लॉकमध्ये अनेक बांधकामं हटवण्यात आली असून सध्या तोडक कारवाईला कोणताही विरोध झालेला नाही. दिल्लीत हनुमान जयंती दिवशी झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणात रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. सध्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. त्यानंतर आता पालिकेने अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून घटनास्थळी 400 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. दरम्यान, मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर या प्रकरणातील घडामोडी वाढल्या. उत्तर दिल्ली महानगरपालिकेने जारी केलेल्या निर्देशात म्हटलं आहे की, पालिकेकडून 20 आणि 21 एप्रिल रोजी दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात बेकायदेशीर बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येईल. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांचे 400 कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.
#WATCH North Delhi Municipal Corporation conducts anti-encroachment drive in Jahangirpuri in Delhi
— ANI (@ANI) April 20, 2022
The civic body has asked for 400 personnel from Delhi Police to maintain the law & order situation during the drive in the area pic.twitter.com/KViPfwPEqr
सकाळपासूनच नागरिकांकडून सामान हलवण्यास सुरुवात
एमएसडी आज या भागातील बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई करणार आहे. यावरून परिसरात तणावाचे वातावरण आहे. जहांगीरपुरी, कुशल सिनेमा चौक समोर सीडी पार्क झोपडपट्टीच्या बाहेर अनेक अवैध बांधकामं आहेत. ही बेकायदा बांधकामे आज हटविण्यात येणार असल्याचे समजताच नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. सर्वांनी आपले सामान तिथून काढायला सुरुवात केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेक प्रकरणी चौथी FIR दाखल, गोळीबार करणारा आरोपी अटकेत; जाणून घ्या आतापर्यंतचे अपडेट्स
- Bulli Bai App : बुली बाई अॅप प्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींना जामीन
- प्रेयसी नक्की कुणाची? दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha