एक्स्प्लोर

Delhi Violence : दिल्लीतील दगडफेक प्रकरणी चौथी FIR दाखल, गोळीबार करणारा आरोपी अटकेत; जाणून घ्या आतापर्यंतचे अपडेट्स

Delhi Violence Upadate : दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 22 आरोपींना अटक केली आहे. प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

Delhi Violence News : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून वेगवान तपास आणि कारवाई सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौथी एफआयआर (FIR) नोंदवली आहे. सोमवारी पोलिसांनी आरोपी सोनू चिकना याला अटक केली. सोनू चिकनावर दगडफेकीवेळी गोळीबार केल्याचा आरोप आहे. दगडफेक आणि तोडफोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनू चिकनाचा शोध सुरू केला. याप्रकरणी आतापर्यंत 22 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या 22 व्यतिरिक्त आणखी दोन अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. 

आतापर्यंत काय घडलं, वाचा 10 मोठे अपडेट्स...

1. पोलिसांनी याप्रकरणी चौथा एफआयआर नोंदवला आहे. व्हिडीओमध्ये गोळीबार करताना दिसत असलेल्या सोनू चिकनाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. आरोपी सोनू चिकनाची अटक सर्वात महत्त्वाची असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्याचे वर्णन कुख्यात गुन्हेगार असं केलं आहे.
3. पहिली एफआयआर 16 एप्रिल रोजी नोंदवण्यात आली होती. यामध्ये विविध गुन्हेगारी कलमांखाली खटला चालवण्यात आला. दुसऱ्या एफआयआरमध्ये परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमा या आरोपीविरोधात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी तिसरी एफआयआर दाखल करण्यात आली.
4. व्हायरल व्हिडीओमध्ये ज्या शस्त्राने सोनू गोळीबार करताना दिसत आहे, त्याच शस्त्रासह सोनू चिकना याला पोलिसांनी अटक केली आहे.
5. सोनू शेख उर्फ ​​सोनू चिकना याला आज रोहिणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
6. सोनू चिकनाच्या अटकेसह आतापर्यंत एकूण 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्सार, अस्लम, जाहिद, शहजाद, मुख्त्यार अली हसन, मोहम्मद अली, अमीर, अक्सर, नूर आलम, जाकीर, अक्रम, इम्तियाज, अहिर, मोहम्मद अली, शेख सौरभ, सूरज, नीरज, सुकेन, सुरेश, सुजित सरकार आणि सलीम चिकना उर्फ सोनू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 
7. या 22 व्यतिरिक्त दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
8. फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. सोमवारी आठ सदस्यांच्या पथकानं हिंसाचाराच्या ठिकाणाहून नमुने गोळा केले.
9. हिंसाचाराचा आरोप असलेल्या अन्सारचे आम आदमी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या आरोपांवर दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, 'दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोणीही पक्षाची टोपी घालू शकतो.'
10. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'सरकारच्या इशाऱ्यावर हिंसाचार होत आहे. सरकारला हवं असते तर हिंसाचार झाला नसता. पोलिसांची कारवाई एकतर्फी आहे.'

एफआयआरनुसार, संध्याकाळी 6 वाजता मिरवणूक जामा मशिदीजवळ पोहोचताच अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या चार ते पाच साथीदारांसह आला आणि मिरवणुकीत सहभागी लोकांशी वाद घालू लागला. बाचाबाची वाढत गेल्यानं परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. यानंतर रस्त्यांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली. लाठ्या, तलवारी घेऊन लोक रस्त्यावर आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP MajhaSushma Andhare : Raj Thackeray यांना वाटत असेल तीर मारला,  त्यांच्या बोलण्याला किती किंमत द्यायची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget