![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आदित्य एल1 च्या लॉन्चिंगचं काऊंटडाऊन सुरू; ISROच्या शास्त्रज्ञांचं मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात साकडं
Aditya-L1 Mission Launch: ISRO ची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम आदित्य L1 शनिवारी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित होणार आहे.
![आदित्य एल1 च्या लॉन्चिंगचं काऊंटडाऊन सुरू; ISROच्या शास्त्रज्ञांचं मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात साकडं isro scientists arrive at tirumala sri venkateswara temple with aditya L1 model offer prayers know details आदित्य एल1 च्या लॉन्चिंगचं काऊंटडाऊन सुरू; ISROच्या शास्त्रज्ञांचं मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात साकडं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/28/0e5eadebf3a9bc9531bd867bf534ba211674914592787617_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aditya-L1 Launch: भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य L1 चं काउंटडाऊन सुरू झालं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) शुक्रवारी (1 सप्टेंबर) यासंदर्भात ही माहिती दिली आहे. यापूर्वी, ISRO च्या शास्त्रज्ञांची एक टीम आदित्य-L1 मिशनच्या मिनी मॉडेलसह तिरुमला श्री वेंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचली.
भारताचं पहिलं सौर मिशन Aditya-L1 हे 2 सप्टेंबर रोजी सकाळी 1150 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेस सेंटरमधून अवकाशात झेपावणार आहे. आदित्य एल-1 च्या लॉन्चिगची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात माहिती देताना इस्रो शास्त्रज्ञ एस सोमनाथ यांनी म्हटलं की, "रॉकेट आणि सॅटेलाईट सज्ज आहे. आम्ही प्रेक्षपणासाठी पूर्ण अभ्यास केलेला आहे."
#WATCH | Andhra Pradesh: A team of ISRO scientists arrive at Tirumala Sri Venkateswara Temple, with a miniature model of the Aditya-L1 Mission to offer prayers.
— ANI (@ANI) September 1, 2023
India's first solar mission (Aditya-L1 Mission) is scheduled to be launched on September 2 at 11.50am from the… pic.twitter.com/XPvh5q8M7F
मिशन आदित्य एल1 मिशन आहे तरी काय?
आदित्य एल-1 मिशनच्या लॉन्चिंगपूर्वी इस्रोच्या प्रमुखांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मिशनच्या लॉन्चिंगपूर्वी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, 'आदित्य एल-1 मिशन लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून लॉन्च केली जाईल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य L-1 या अंतराळयानाला L-1 बिंदूवर घेऊन जाईल. L1 हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे, म्हणजेच 15 लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर 15 कोटी किलोमीटर आहे.
इस्रोचे प्रमुख पुढे बोलताना म्हणाले की, आदित्य एल-1 मिशन ही सूर्याचं निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम असणार आहे. प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉकेट आणि उपग्रह तयार आहेत. प्रक्षेपणाची तालीमही पूर्ण झाली आहे. इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV-C57 आदित्य-L1 ला पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडेल. यानंतर, तीन किंवा चार ऑर्बिट मैन्यूवर केल्यानंतर, ते थेट पृथ्वीच्या स्फेयर ऑफ इंफ्लूएंस (SOI) बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल. हा टप्पा जरा जास्त काळा चालेल.
आदित्य-L1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये (Halo Orbit) समाविष्ट केलं जाईल. जिथे L1 पॉईंट आहे. हा पॉईंट सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत तो फक्त 1 टक्के आहे. या प्रवासासाठी 127 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे अवघड मानलं जातं, कारण त्याला दोन मोठ्या ऑर्बिटमधून जावं लागतं.
इस्रोच्या आदित्य-L1 मिशनचं वैज्ञानिक उद्दीष्ट काय?
आदित्य-L1 हा अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात आदित्यला पृथ्वीपासून 800 किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आता, आदित्यला Lagrangian पॉईंट L1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. म्हणूनच, या मिशनला आदित्य-L1 असं म्हटलं जात आहे. सोलर कोरोनाचे निरीक्षण करणं हाच इस्रोच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)