Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravi Ashwin : कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला की, मी पर्थला आलो तेव्हा अश्विनने मला निवृत्तीबद्दल सांगितले होते. एखाद्या खेळाडूने निर्णय घेतला तर त्याचा आदर केला पाहिजे.
Ravi Ashwin रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अश्विनने तिन्ही फॉरमॅटसह 287 सामने खेळले आणि 765 विकेट घेतल्या. अश्विन हा भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आहे ज्यांनी 953 विकेट्स घेतल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला की, मी पर्थला आलो तेव्हा अश्विनने मला निवृत्तीबद्दल सांगितले होते. एखाद्या खेळाडूने निर्णय घेतला तर त्याचा आदर केला पाहिजे. अश्विन उद्या भारतात परतणार असल्याचे त्याने सांगितले.
धोनी आणि अश्विनच्या योगायोगाची चर्चा
दरम्यान, टीम इंडियाचा माजी कॅप्टन धोनीने बरोबर 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये धोनीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत धक्का दिला होता. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी कसोटी संपल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता 2024 मध्ये अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी कसोटी संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा करताना ऑस्ट्रेलिया ठिकाण निवडलं आहे.
2014 - MS Dhoni announced his retirement after the 3rd Test Vs Australia.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2024
2024 - Ravi Ashwin announced his retirement after the 3rd Test Vs Australia. pic.twitter.com/hHWKoUdm5q
कसोटीत 537 बळी घेतले
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 106 सामन्यात 537 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 37 5 विकेट आहेत आणि 8 वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 156 एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने T-20 मध्ये 72 विकेट घेतल्या आहेत. एक फलंदाज म्हणून अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 3503 धावा केल्या आणि एकूण 6 कसोटी शतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची एकूण 8 शतके होती.
सर्वाधिक पाच बळी
सर्वाधिक पाच बळी घेणारा भारतीय अश्विनने कसोटीत 37 वेळा पाच बळी घेतले आहेत, जे कोणत्याही भारतीय गोलंदाजाने घेतलेले सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर कुंबळेची पाळी येते. कुंबळे यांनी कसोटीतील 35 डावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक डावात पाच विकेट्स घेण्याचा एकूण विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. असे त्याने 67 वेळा केले. अश्विन शेन वॉर्नसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स
अश्विनने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध 53 सामने खेळले आणि 150 बळी घेतले. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांच्याविरुद्ध अश्विनने 50 सामन्यांत 146 बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर परदेशात सर्वाधिक विकेट घेतल्या
अश्विनच्या नावावर ऑस्ट्रेलियात परदेशात सर्वाधिक विकेट आहेत. त्याने कांगारूंच्या घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 38 सामने खेळले आणि 71 बळी घेतले. याशिवाय त्याने श्रीलंकेत 16 सामन्यात 49 बळी घेतले आहेत. अश्विनच्या नावावर भारताच्या 131 सामन्यात 475 बळी आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या