चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहीमेनंतर इस्रोनं आता सूर्य मिशन लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय आदित्य एल-1 असं भारताच्या पहिल्या सूर्य मिशनचं नाव आहे. सूर्यमिशनचं नाव आदित्य एल-1 मधील एल-1चा नेमका अर्थ तुम्हाला माहितीये का? इस्रोनं दिलेल्या नावातील आदित्यचा अर्थ सूर्य, तर एल-1 चा अर्थ लाग्रेंज पॉईंट लाग्रेंज पॉईंट म्हणजे, अंतराळातील ती जागा जिथून सूर्याचा तपशीलवार अभ्यास केला जाणार आहे. एल-1 पॉईंट पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. इस्रो आपलं आदित्य एल-1 याच लाग्रेंज पॉईंटवर पाठवणार आहे. याच एल-1 पॉईंटवरुन ISRO सूर्याचं तापमान, ओझोनची पातळी अन् इतरही गोष्टींचा तपशीलवार अभ्यास केला जाणार आहे. आदित्य एल-1 ला या लाग्रेंज पॉईंटवर पोहोचण्यासाठी तब्बल 4 महिन्यांचा वेळ लागणार आदित्य L1 सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 7 पेलोड सोबत घेऊन जाणार आहे यापैकी 4 पेलोड थेट सूर्याचाच अभ्यास करणार आहे. उरलेले 2 पेलोड L1 वर पार्टिकल्स अन् फील्ड्सचा अभ्यास करणार आहेत.