Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
Ravichandran Ashwin : सामन्यातील ब्रेक दरम्यान अश्विनने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशीही चर्चा केली. यानंतर काही वेळातच त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन निवृत्तीची घोषणा केली.
Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रविचंद्रन अश्विनने याची घोषणा केली. पाचव्या दिवशी सामना थांबला तेव्हा टीम इंडियाचे सदस्य ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होते, त्यादरम्यान रविचंद्रन अश्विनने विराट कोहलीला मिठी मारली. यानंतर अश्विन लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. सामन्यातील ब्रेक दरम्यान अश्विनने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशीही चर्चा केली. यानंतर काही वेळातच त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन निवृत्तीची घोषणा केली.
RAVI ASHWIN ANNOUNCES HIS RETIREMENT.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2024
- An emotional speech by Ash. 🥹❤️pic.twitter.com/ZkVoKVD0m0
मुरलीधरनच्या बरोबरीचे सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार!
38 वर्षीय अश्विन भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एकूण 537 कसोटी विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने भारतासाठी 37 वेळा एका डावात सर्वाधिक 5 बळी घेतले. त्याच वेळी, त्याने मुरलीधरनच्या बरोबरीचे सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार (11 वेळा) जिंकले आहेत. फिरकीपटू म्हणून, त्याचा गोलंदाजीचा स्ट्राइक रेट 50.7 (200+ विकेट) आहे, जो सर्वोच्च आहे. तमिळनाडूच्या या फिरकीपटूने नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून ते सातत्याने कसोटी संघात राहिला. अश्विनने 106 कसोटी सामन्यांमध्ये 24.00 च्या सरासरीने 537 विकेट घेतल्या आहेत. या काळात अश्विनने 37 डावात पाच विकेट घेतल्या. त्याने सामन्यात 8 वेळा 10 विकेट घेतल्या. डावातील त्याची सर्वोत्तम कामगिरी 7/59 आहे. तर कसोटी सामन्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी 13/140 अशी आहे.
- 537 Test wickets.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2024
- 37 Five wicket hauls.
- 3,503 runs.
- 6 Test centuries.
- Joint most POTS awards in Tests.
CRICKET AND FANS WILL MISS YOU, RAVI ASHWIN. 🥹❤️ pic.twitter.com/lPY6bajiLf
अश्विनने 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33.20 च्या सरासरीने 156 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यातील त्याचे सर्वोत्तम गोलंदाजीचे विश्लेषण म्हणजे 25 धावांत चार बळी. दुसरीकडे, अश्विनने 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 23.22 च्या सरासरीने 72 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी आठ धावांत चार विकेट्स अशी आहे. अश्विनने 151 कसोटी डावांमध्ये 25.75 च्या सरासरीने 3503 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 6 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली. एकदिवसीय सामन्यात त्याने 63 डावात 707 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, टी-20 इंटरनॅशनलमध्ये अश्विनला 19 डावात केवळ 184 धावा करता आल्या.
अश्विनचे कसोटी शतक
- 103 धावा वि. वेस्ट इंडिज, मुंबई, 2011
- 124 धावा वि. वेस्ट इंडिज, कोलकाता, 2013
- 113 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड, 2016
- 118 धावा वि. वेस्ट इंडीज, सेंट लुसिया, 2016
- 106 धावा वि. इंग्लंड, चेन्नई, 2021
- 113 धावा विरुद्ध बांगलादेश, चेन्नई, 2024
इतर महत्वाच्या बातम्या