एक्स्प्लोर
इस्रोच्या 'त्या' कामगिरीमुळे फनी वादळापासून मोठी हानी टळली, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फनी चक्रीवादळात हजारो लोकांचे जीव वाचवण्यात इस्रोने (ISRO) मोलाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे देशभरातून इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवी दिल्ली : ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फनी चक्रीवादळात हजारो लोकांचे जीव वाचवण्यात इस्रोने (ISRO) मोलाची भूमिका निभावली आहे. फनी चक्रीवादळ धडकणार याचा अंदाज इस्रोला आला होता. त्यामुळे या वादळाची माहिती आपल्याकडे होती. माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन, ओदिशा सरकार आणि केंद्र सरकारने संपूर्ण खबरदारी घेतली होती. त्यामुळेच मोठी हानी टाळता आली.
फनी चक्रीवादळाची माहिती मिळाल्यानंतर आठवड्याभरापासून इस्रोचे तब्बल 5 सॅटेलाईट या वादळाच्या हालचालीवर नजर ठेऊन होते. वादळाबाबतची प्रत्येक सेकंदा-सेकंदाची अपडेट मिळाल्यामुळे लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या संपत्तीचेही रक्षण केले गेले.
व्हिडीओ पाहा
वादळाबाबतची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्यामुळे या संकटाला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची 80 हून अधिक पथके तैनात करण्यात आली होती. लोकांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदल सज्ज होते. त्यासोबतच किनारपट्टीलगतच्या गावांमधील तब्बल 11 लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळेच इतके मोठे संकट येऊनही आपण त्याला धीराने तोंड देऊ शकलो.
VIDEO | फनी ठरलं 20 वर्षातलं सर्वात विध्वसंक वादळ | ओदिसा | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
वादळ येण्यापूर्वी ओदिशा सरकारने दक्षता घेतली होती. 225 हून अधिक ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळावरुन हवाई वाहतूकदेखील बंद ठेवली होती. ओडिशा सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement