एक्स्प्लोर
Advertisement
रेल्वेचं तिकीट बूक करा, पैसे नंतर द्या, IRCTC ची नवी सेवा
मुंबई : भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने प्रवाशांसाठी नवा पर्याय आणला आहे. IRCTC ने ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा आणली आहे. यामुळे रेल्वेचं तिकीट बूक करुन नंतर पैसे देता येतील.
‘बाय नाऊ, पे लॅटर’मुळे तिकीट बूक करताना अडथळा ठरणाऱ्या मोठ्या पेमेंट प्रोसेसपासून सुट्टी मिळेल. ई-पे लॅटरच्या सहयोगाने IRCTC ने ही सुविधा आणली आहे. तिकीट बूक केल्यानंतर 14 दिवसात कधीही पेमेंट करता येईल. यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन पेमेंट करावं लागेल.
‘बाय नाऊ, पे लॅटर’ सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅनची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ज्यानंतर तुम्हाला तिकीट बूक करता येईल.
दरम्यान यापूर्वीच IRCTC ने तिकिटासाठी कॅश ऑन डिलीव्हरी सेवा सुरु केली आहे. तिकीट बूक केल्यानंतर तुम्ही ते घरी मागवू शकता. त्यानंतर पेमेंट कार्ड किंवा कॅशद्वारे करु शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भविष्य
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement