(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रिटन ते भारत आंतरराष्ट्रीय विमान सेवा 8 जानेवारीपासून सुरु होणार : विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी
भारत आणि ब्रिटन दरम्यानची विमान सेवा 8 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती स्थगिती उठवण्यात आली आहे. 8 जानेवारीपासून भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या विमानसेवेला परवानगी देण्यात आल्याची माहिती विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) लक्षात घेता 23 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान इंग्लंड ते भारत उड्डाणे रद्द केली होती.
हरदीपसिंग पुरी म्हणाले, 8 ते 23 जानेवारी दरम्यान मुंबई, बंगळूरु आणि हैदराबादसाठी आठवड्याला फक्त 15 उड्डाणांना परवानगी दिली आहे.
It has been decided that flights between India & UK will resume from 8 Jan 2021. Operations till 23 Jan will be restricted to 15 flights per week each for carriers of the two countries to & from Delhi, Mumbai, Bengaluru & Hyderabad only. @DGCAIndia will issue the details shortly
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) January 1, 2021
कोरोनाचा घसरता आलेख एकीकडे दिलासा देत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रनने थोडी चिंताही वाढली आहे. ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण देशात आढळत आहेत. नव्या स्ट्रेनचे आणखी चार रुग्ण देशात आढळले आहेत.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती
भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण सुरू आहे. सक्रिय रुग्णसंख्या आज 2.54 लाखांपर्यंत खाली आली आहे. गेल्या 179 दिवसातील हा नीचांक आहे. 6 जुलै 2020 रोजी एकूण सक्रिय रुग्णसंख्या 2,53,287 इतकी होती. भारताची सध्याची सक्रिय रुग्णसंख्या देशाच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 2.47% आहे.
देशात दैनंदिन नवीन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात 20 हजाराच्या आसपास राहिली आहे. गेल्या 24 तासात नवीन रुग्णसंख्या 20,035 इतकी नोंदली गेली तर 23,181 रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. गेल्या 35 दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे.
संबंधित बातम्या :