(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतासाठी किती धोकादायक? एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले...
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आता भारतातही शिरकाव केला आहे. अतिशय संसर्गजन्य असून वेगाने पसरतो, असं सांगत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. आता कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशभरात आतापर्यंत दोन डझनहून अधिक रुग्ण सापडले आहेत, ज्यांच्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाच्या नवा प्रकाराचा 70 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचं सांगितलं आहे. यामुळे सरकारची चिंताही वाढली आहे.
कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनबाबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, "प्री-एपिडिमोलॉजिकल डेटा (pre-epidemiological data) मधून समजलं आहे की, कोरोनाव्हायरसने अनेक ठिकाणी आपलं स्वरुप बदललं आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तो अतिशय संसर्गजन्स असून वेगाने पसरतो."
It's unlikely that UK strain, even if it had entered India, is causing a significant effect on our cases & hospitalization. But we need to be extra careful & make sure that we don't let it come in India in a big way: Dr Randeep Guleria, Director, AIIMS Delhi on Corona's UK strain https://t.co/gsDADsHJOT pic.twitter.com/0cnydb8Q2F
— ANI (@ANI) December 30, 2020
"ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच आला असण्याची शक्यता आहे. पण भारतात मागील काही आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतातील रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांवर परिणाम करु शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे, जेणेकरुन याच्या प्रादुर्भावाला आळा बसेल," असं रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.
युरोपातून येणाऱ्या हवाई वाहतुकीवर तात्पुरती स्थगिती केंद्र सरकारने युरोपातून येणारी विमान तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केली आहेत. 25 नोव्हेंबर पासून 23 डिसेंबरपर्यंत एकूण 33 हजार नागरिक युकेहून भारतातील विविध विमानतळावर उतरले आहेत. त्यापैकी 114 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी भारताच्या विविध दहा प्रयोगशाळांमध्ये पाठवले होते. त्याच्या अहवालानंतर सहा जणांमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळणाऱ्यांची संख्या वाढली असून 20 पेक्षा जास्त जण बाधित आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे.
संबंधित बातम्या
Coronavirus | कोरोनाचे बदलते प्रकार लसीचा प्रभाव कमी करणार नाहीत- आरोग्य मंत्रालय
ब्रिटन ते भारत आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील तात्पुरती स्थगिती 7 जानेवारी 2021 पर्यंत वाढवली
Corona New Strain | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या भारतीयांची संख्या वाढली, 20 जणांना लागण