सोनम इंदूरमधून हनिमूनला मेघालयात गेली, पण नवऱ्याचा थेट मृतदेहच सापडला अन् आता गाजीपुरात 17 दिवसांनी स्वत: मध्यरात्री धाब्यावर सापडली; पोलिसांनी सांगितलेल्या घटनाक्रमाने थरकाप
Sonam Raghuvanshi found : इंदूरमधील हे जोडपे 11 मे 2025 रोजी लग्नानंतर हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. ते 20 मे रोजी मेघालयात पोहोचले आणि 23 मे रोजी कुटुंबाशी शेवटचे बोलले.

Sonam Raghuvanshi found : इंदूरच्या (Indore) राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी मेघालय पोलिसांना (Police) मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी पत्नी सोनमसह तीन आरोपींना अटक केली आहे. मेघालय डीजीपी म्हणाले की, राजा रघुवंशी यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना हायर करण्यात आले होते. डीजीपी आय नोंगरांग म्हणाले, "एक आरोपी उत्तर प्रदेशातून (UP News) पकडला गेला, तर इतर दोघांना एसआयटीने इंदूरमधून पकडले." ते पुढे म्हणाले की, "सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि नंतर तिला अटक करण्यात आली."
टूर गाईडने ही माहिती दिली होती
शनिवारी (7जून 2025) एका टूर गाईडने सांगितले होते की, इंदूरचे हनिमून कपल राजा रघुवंशी आणि पत्नी सोनमसोबत मेघालयातील सोहरा परिसरातून बेपत्ता झालेल्या दिवशी इतर तीन लोकही उपस्थित होते. एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की गाईडने पोलिसांना ही माहिती दिली होती.
#WATCH | Indore, MP: On Sonam Raghuvanshi found near Ghazipur, UP, Vipul Raghuvanshi, brother of Raja Raghuvanshi, says, "I spoke to Govind around 2 AM. He informed me that Sonam was found in Uttar Pradesh. After we contacted UP Police, Sonam was taken by the police. She did not… https://t.co/AGDc6ZeozK pic.twitter.com/zQh5xJmPLP
— ANI (@ANI) June 9, 2025
मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनीही ट्विट केले
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी ट्विट केले आहे की, मेघालय पोलिसांना इंदूर राजा हत्याकांड प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या हल्लेखोराला अटक करण्याची कारवाई अजूनही सुरू आहे.
Indore missing couple case | Sonam Raghuvanshi, age about 24 years, was found at Kashi Dhaba on the Varanasi-Ghazipur main road. She was sent to Sadar Hospital for initial treatment and then kept in the One Stop Centre in Ghazipur: ADG Law and Order, Uttar Pradesh, Amitabh Yash… pic.twitter.com/6buc7iX5eG
— ANI (@ANI) June 9, 2025
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
इंदूरमधील हे जोडपे 11 मे 2025 रोजी लग्नानंतर हनिमूनसाठी (Honeymoon Couple) शिलाँगला गेले होते. ते 20 मे रोजी मेघालयात पोहोचले आणि 23 मे रोजी कुटुंबाशी शेवटचे बोलले. त्यानंतर त्यांचे दोघांचेही फोन बंद होते. या जोडप्याची भाड्याने घेतलेली स्कूटी सोहरारीम परिसरात सोडून दिलेली आढळली. त्यानंतर 2 जून रोजी वेई सोडोंग धबधब्याजवळील एका नाल्यात राजा रघुवंशीचा कुजलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पत्नी सोनमचा कोणताही पत्ता लागला नाही, ज्यामुळे कुटुंबाला अपहरण किंवा तस्करीचा संशय येऊ लागला. इंदूरचे वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांचे 11 मे रोजी सोनम रघुवंशीशी लग्न झाले. राजाचा मृतदेह सापडल्यापासून पोलिस सोनमचा शोध घेत होते. आता सोनम गाजीपूरमध्ये सापडल्यानंतर, शिलाँगमध्ये या जोडप्याचे काय झाले आणि राजाचा मृत्यू कसा झाला हे लवकरच कळेल अशी अपेक्षा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























