Indore Honeymoon Couple: अखेर सोनम सापडली, मेघालयातून झाली होती बेपत्ता; हनिमूनला गेलेल्या नवऱ्याचा मृतदेह सापडला, टुरिस्ट गाईडने दिली महत्त्वाची माहिती
Indore Honeymoon Couple: इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. सध्या सोनमनं आत्मसमर्पण केलं आहे. तिने नवऱ्याची सुपारी हल्लेखोरांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Indore Honeymoon Couple: इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. सोनमने यूपीतील गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिस मोहीम राबवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम काही तासांपूर्वी सापडली आहे. सध्या गाजीपूर पोलिसांनी इंदौर पोलिसांना या घटनेची माहिती कळवली आहे. त्यानंतर सोनमला अटक करण्यात आली आहे आणि इंदौर पोलिस गाझीपूरला रवाना झाले आहेत. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सोनमने स्वतः तिच्या घरी फोन केला.
सोनमने आत्मसमर्पण केले
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनीही या प्रकरणाबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, इंदौर राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, सोनमने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी मोहीम अजूनही सुरू आहे. मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनीही या प्रकरणात निवेदन दिले आहे. त्यांनी सांगितले की, इंदौरमधील व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पत्नीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सोनमला कोणतीही दुखापत झालेली नाही. ती पूर्णपणे ठीक आहे. सध्या पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले आहे.
Indore missing couple case | Sonam Raghuvanshi, age about 24 years, was found at Kashi Dhaba on the Varanasi-Ghazipur main road. She was sent to Sadar Hospital for initial treatment and then kept in the One Stop Centre in Ghazipur: ADG Law and Order, Uttar Pradesh, Amitabh Yash… pic.twitter.com/6buc7iX5eG
— ANI (@ANI) June 9, 2025
टुरिस्ट गाईडने दिली महत्त्वाची माहिती
शनिवारी, एका टुरिस्ट गाईडने माहिती देताना सांगितले की, इंदौर येथील हनिमून कपल राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम मेघालयातील सोहरा परिसरातून बेपत्ता झाले त्या दिवशी त्यांच्यासोबत तीन पुरुष होते. एका पोलिस अधिकाऱ्याने पुष्टी केली की, गाईडने पोलिसांना ही माहिती दिली होती. 23 मे रोजी हे जोडपे बेपत्ता झाले होते, तर 2 जून रोजी राजाचा मृतदेह दरीत सापडला होता, तर त्याच्या पत्नीचा सोनमचा शोध सुरू होता. मावलाखियात येथील मार्गदर्शक अल्बर्ट पीडी यांनी सांगितले की, त्यांनी 23 मे रोजी सकाळी 10 वाजता नोंगरियात ते मावलाखियात पर्यंत 3000 हून अधिक पायऱ्या चढताना या जोडप्यासह तीन पुरुष पर्यटकांना शेवटचे पाहिले होते.
त्याने सांगितले की त्याने त्या जोडप्याला ओळखले कारण त्यांनी आदल्या दिवशी त्याला नोंग्रिअटला घेऊन जाण्यासाठी त्यांना विचारले होते, परंतु त्यांनी नम्रपणे त्यास नकार दिला आणि दुसरा टुरिस्ट गाईड घेतला होता. चार पुरुष पुढे चालत होते तर ती महिला मागे होती. ते चार पुरुष हिंदीत बोलत होते, पण मला ते काय बोलत आहेत ते समजत नव्हते कारण मला फक्त खासी आणि इंग्रजी येते, असेही त्या टुरिस्ट गाईडने सांगितले होते.
नेमकं काय प्रकरण?
राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे 11 मे रोजी इंदौरमध्ये लग्न झाले होते. ते 20 मे रोजी ते दोघे हनीमूनसाठी मेघालयला गेले होते. सुरवातीला त्यांनी गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि ते पुढे मेघालयला निघाले. सुरुवातीला दोघांशी संपर्क होत होता, मात्र नंतर संपर्क तुटला. राजाच्या मोठ्या भावाला वाटले की नेटवर्कचा काहीतरी अडथळा असेल, पण 24 मे पासून दोघांचे मोबाईल बंद झाले. त्यामुळे त्यांना चिंता वाटू लागली. सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन यांनी शिलॉन्ग गाठले आणि शोध पथकासोबत त्यांचा शोध घेऊ लागले.
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी 'एक्स'वर माहिती देताना सांगितले की, "राजा रघुवंशी हत्याकांडात सात दिवसांच्या आत मेघालय पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मध्य प्रदेशमधील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, महिलेनं सरेंडर केलं आहे आणि आणखी एका हल्लेखोराला पकडण्यासाठी ऑपरेशन अजूनही सुरू आहे." तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका ढाब्यावर आत्मसमर्पण केले. या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सोनमने पोलिसांना दिलेल्या जबाबात हत्येची कबुली दिली असून तिने हे कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर रघुवंशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.























