'रोमियो'मुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार, दोन MH-60 रोमियो हेलिकॉप्टर भारतात दाखल
MH-60 Romeo India : अमेरिकेकडून MH-60 रोमियो हेलिकॉप्टरची खेप भारतात दाखल झाली आहे. यामुळे हवाई दलात दोन MH-60 रोमियो हेलिकॉप्टर सामील झाले आहेत.
MH-60 Romeo Helicopter India Delivery : भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आता आणखी वाढणार आहे. भारताने अमेरिकेसोबत MH-60 रोमियो हेलिकॉप्टरसाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत हेलिकॉप्टरची खेप भारतात दाखल झाली आहे. या अंतर्गत दोन MH-60 रोमियो हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले आहेत. भारताने अमेरिकेशी MH60R हेलिकॉप्टर पुरवण्याबाबत करार केला होता. त्यानुसार 24 हेलिकॉप्टरपैकी दोन हेलिकॉप्टर भारताला मिळाली आहेत.
भारताला मिळणार 24 MH-60 रोमियो हेलिकॉप्टर
नौदलाची पाणबुडी-विरोधी/पृष्ठभागविरोधी युद्ध आणि देखरेख क्षमता मजबूत करण्यासाठी भारताने 2020 मध्ये अमेरिकेकडून 24 लॉकहीड मार्टिन-सिकोर्स्की MH-60R हेलिकॉप्टरची मागणी केली होती. अमेरिकेकडून भारताला या हेलिकॉप्टरची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. दोन मार्टिन-सिकोर्स्की MH-60R हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले आहेत.
Two MH-60 R multirole helicopters from the US were received by the Indian Navy at Cochin International Airport on 28 July 2022 and the third helicopter is scheduled to be delivered in Aug 2022. pic.twitter.com/vGVdRDAyVu
— ANI (@ANI) July 28, 2022
पुढील महिन्यात पोहोचेल नवीन खेप
भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देस सांगितलं की, अमेरिकेहून गुरुवारी दोन 24 MH-60 रोमियो हेलिकॉप्टर कोचीन विमानतळावर दाखल झाले आहेत. पुढील महिन्यात हेलिकॉप्टरी पुढची खेपही भारतात पोहोचेल. अमेरिकेसोबत केलेल्या कराराअंतर्ग भारताला एकूण 24 हेलिकॉप्टर मिळणार आहेत.
लॉकहीड मार्टिन-सिकोर्स्की MH-60R हेलिकॉप्टरची खासियत
लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशनद्वारे निर्मित MH-60R हेलिकॉप्टर हे सर्व हवामानातील (All-Weather) हेलिकॉप्टर आहे जे अत्याधुनिक एव्हियोनिक्स आणि सेन्सर्ससह डिझाइन केलेलं आहे. भारताने अमेरिकेसोबत सुमारे 15,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यानुसार भारताने 24 हेलिकॉप्टर खरेदी केले आहेत. MH-60R हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी युद्ध, जहाजविरोधी स्ट्राइक, विशेष सागरी ऑपरेशन तसेच शोध आणि बचाव कार्यांसह विविध भूमिकांमध्ये कामगिरी बजावेल.