एक्स्प्लोर

भारतीयांचं Happy New Year! कसं घडलं भारताचं स्वतःच कॅलेंडर?

Indian National Calendar : भारतीय सौर 1944! भारताच्या स्वतःच्या कॅलेंडरची कहाणी

Indian National Calendar : जर आम्ही तुम्हाला म्हटलं की, चालू वर्ष हे भारतीय सौर 1944 आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही बसणार तुमचा विश्वास पण हे सत्य आहे. 

आता सुरू असलेल वर्ष हे 1944 आहे. पण ते जगानं मान्यता दिलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नाही. तर भारताच्या स्वतःच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, म्हणून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर नुसार. त्याला आपण 'भारतीय सौर कॅलेंडर' देखील म्हणतो. सौर म्हणजे, सूर्यावर आधारित. होय! भारताचं स्वतः चं हे कॅलेंडर आहे. सरकारचा शासनादेश किंवा अगदी UPSC चं नोटिफिकेशन जरी तुम्ही पाहिलं तर त्यात याची नोंद असते.

काय आहे हे प्रकरण?

भारताचा विचार केला तर भारतात एकूण चार महत्त्वाची कॅलेंडर्स आहेत. विक्रम संवत, शक संवत, हिजरी आणि ग्रेगोरियन कॅलेंडर. यात पहिल्या दोन कॅलेंडर्सना हिंदू कॅलेंडरचा दर्जा आहे. कारण अनेक ठिकाणी हिंदू पंचांग वापरताना यांचा उपयोग केला जातो. हिजरी हे एक इस्लामिक कॅलेंडर आहे. तर ग्रेगोरियन कॅलेंडर हे Pope Gregory यांनी निर्माण केलेलं असून जागतिक दर्जाचं कॅलेंडर आहे. 

भारतात आजही अनेक लोक महिन्यांची मोजणी January, February अशी न करता चैत्र, वैशाख असे महिने मोजतात. आता हे आलं कुठून? तर हे आलं शक आणि विक्रम युगातून. 

काय आहे सौर कॅलेंडर किंवा शक कॅलेंडर?

78 CE, म्हणजे सामान्य युगातील ही गोष्ट आहे. आपण याला 78AD देखील म्हणू शकतो, म्हणजेच येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतरचा काळ. AD म्हणजे अनेक जण After Death म्हणतात. त्याचं कारण असं की BC म्हणजे आपण Before Chirst म्हणतो. येशू ख्रिस्त यांचा जन्म हा ख्रिस्ती बांधवांसाठी एक रेफेरेन्स पॉईंट आहे. म्हणून कालखंड मोजताना BC आणि AD म्हणतात. AD म्हणजे Anno Domini, म्हणजेच देवाच्या काळातील वर्ष. येशूच्या जन्मानंतरचा काळ, म्हणजेच त्याच्या अस्तित्वाचा काळ म्हणजेच AD.

असो, या कथेचे अनेक Narratives आहेत पण असं म्हणतात की, सातवाहन राजवंशातील राजा शालीवहान यांनी 78AD मध्ये एक मोठा विजय मिळवला होता आणि तेव्हा पासूनच त्यांच्या युगाला शक युग असं म्हणतात. राजा शालीवहानचं महाराष्ट्र राज्यसोबतही नातं आहे. त्यांनी दीर्घ काळ महाराष्ट्र असणाऱ्या भारताच्या मध्य भागावर राज्य केलं होतं तर प्रतिष्ठान म्हणजे आजच्या पैठण ही त्यांची राजधानी होती. त्याकाळी प्रत्येक राजाला वाटायचं की आपल्या नावाने किंवा कालखंडावर आधारित एकतरी कॅलेंडर असावं आणि याच प्रकारे सौर कॅलेंडरचा उदय झाला. 

सौर कॅलेंडर असून ते सूर्यभ्रमणावर आधारित असतं. सौर कॅलेंडरच्या वर्षात ग्रेगोरीयन कॅलेंडर प्रमाणेच 365 दिवस तर 12 महिने असतात. ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरुवात की, थंडीत होते. तर शक कॅलेंडरची सुरुवात वसंत ऋतूच्या सुरुवातीला होतं. महिन्यांचं म्हटलं तर शकमध्ये ते ही 12 आहेत. पण इंग्रजी प्रमाणे जानेवारी, फेब्रुवारी असं नसून चैत्र, वैशाख, ज्येष्ठपासून सुरू होतात. तर फाल्गुन या वर्षाचा शेवटचा महिना असतो. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये पहिल्या महिन्यात 31 दिवस असतात. तर दुसऱ्या महिन्यात 30 (28,29) आणि हाच सीक्वेन्स शेवटपर्यंत असतो तर शक कॅलेंडरमध्ये पहिले सहा महिने हे 31 दिवसांचे तर शेवटचे सहा महिने 30 दिवसांचे असतात. विक्रम संवत कॅलेंडर पाहिलं तर ते पुर्णतः चांदभ्रमणावर आधारित असून वर्षाचे महिने जरी 12 असले तरी दिवस मात्र 354 ते 355 आहेत. त्यामुळे ऋतूंचा मेळ अजिबात बसत नाही. 

सौर कॅलेंडर हे Gregorian कॅलेंडर सुरु होणाच्या 78 वर्ष उशिरा आलं, त्यामुळे Gregorian कॅलेंडरचा प्रवास साल शून्य ते साल 2022 आहे तर आजच्या काळात सौर कॅलेंडरचा प्रवास हा साल 78 ते साल 2022 आहे. म्हणजेच 2022 मधून 78 वजा केले तर तुम्हाला सौर कॅलेंडरचं चालू वर्ष मिळतं, ते म्हणजे 1944.

सौर कॅलेंडर भारतचं राष्ट्रीय कॅलेंडर कसं झालं? 
देश स्वतंत्र झाला आणि प्रगतीच्या दिशेनं मार्गस्त झाला. देशात अनेक कॅलेंडर्स होती पण एक योग्य, सर्वधर्मसमभावी आणि एकसमान कॅलेंडर असावं असं अनेकांचं मत होतं आणि त्याकरता तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेतला. त्यावेळी भारतात अनेक कॅलेंडर्स असल्यानं एकसमानता अजिबात नव्हती. प्रत्येक कॅलेंडरचा दृष्टिकोन हा वेगळा होता त्यामुळे सुवर्णमध्य काढणं हाच एक पर्याय होता. 

देशातील मुसलमान त्यावेळी हिजरी कॅलेंडर वापरायचे. तर अनेक हिंदू पंचांगचा वापार मोठ्या प्रमाणात करायचे. पंचांग हे चंद्रावर आधारित असून काही वेळेस ते Lunisolar म्हणजेच चंद्र आणि सूर्य दोघांच्या गती आणि हालचालींवर अवलंबून असतो. त्यात आपल्या देशात उत्तर भारतात शुक्लपक्ष मानला जातो तर दक्षिण भारतात कृष्णपक्ष. 

पौर्णिमा ते अमावस्या हा कालावधी 15 दिवसांचा असतो ज्याला कृष्णपक्ष म्हणतात. अमावस्या ते पौर्णिमा हा आणखी 15 दिवस असतो, ज्याला शुक्लपक्ष म्हणतात.
आपल्याकडे पौर्णिमंत आणि अमवासयंत असे दोन प्रकार असून उत्तरभारतीय पौर्णिमंत पध्दत वापरत असून त्यांचा महिना पौर्णिमेपासून सुरू होतो तर दक्षिण भारतीय अमवासयंत पद्धत वापरून त्यांचा महिना हा अमावस्येच्या दिवशी सुरू होता. म्हणूनच श्रावण महिना सुरू होण्यात उत्तर आणि दक्षिण भारतात 15 दिवसांचा फरक पडतो.

पाहा व्हिडीओ : Indian National Calendar : भारतीय सौर 1944! भारताच्या स्वतःच्या कॅलेंडरची कहाणी

या सर्व गोष्टींमुळेच अस्तित्वात असणाऱ्या कॅलेंडर्समध्ये एकसमानता कुठेच नव्हती. अशा काळात भारताला Gregorian कॅलेंडरची मात्र फार मदत झाली.

आता या कॅलेंडरप्रकरणात एकसमानता आणण्यासाठी डॉ. मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती 1952 साली नेमण्यात आली. डॉ. मेघनाद सहा हे एक नामांकित  खगोल भौतिकशास्त्रज्ञ होते. समितीनं अनेक वर्ष या भारतातील विवध कॅलेंडर्सवर अभ्यास केला. हिजरी आणि हिंदू पंचांगमध्ये अनेक त्रुटी जाणवल्यानं समितीनं अखेरीस सौर कॅलेंडरला पसंती दिली. कॅलेंडरमध्ये परिस्थिती आणि गरजेनुसार बदल करून सौर कॅलेंडर डॉ. मेघनाद सहा यांनी देशाचं अधिकृत कॅलेंडर म्हणून घोषित केलं.

 सौर कॅलेंडर हे पूर्णतः विज्ञान आणि खगोल भौतिक शास्त्रावर अवलंबून असून त्याची धार्मिक ओळख असली तरीही विज्ञान हेच त्याचं मूळ आहे. 

22 मार्च 1957 रोजी तब्बल 5 वर्षांच्या कठोर परिश्रमाने भारताला आपलं स्वतःचं असं कॅलेंडर मिळालं. Gregorian कॅलेंडरच्या 22 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला दिवस असतो. आज अनेक सरकारी कार्यालयांमध्ये हे कॅलेंडर नियमित पणे वापरलं जातं, आकाशवाणी देखील याचा वापर करते आणि इतकंच नाही तर संसदे देखील याचे पालन होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget