एक्स्प्लोर

Zakir Naik Row: 'फरार झाकीर नाईकला तुमच्या देशात एंट्री देऊ नका', भारत सरकारची ओमानला विनंती

Zakir Naik: फरार झाकीर नाईकची चारही बाजूंनी कोंडी करण्यासाठी भारत सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. अशातच भारताने ओमान सरकारला झाकीर नाईकला देशात प्रवेश देऊ नये, अशी विनंती केली आहे.

Zakir Naik: फरार झाकीर नाईकवर चारही बाजूंनी कोंडी करण्यासाठी भारत सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. अशातच भारताने ओमान सरकारला झाकीर नाईकला देशात येऊ देऊ नये, अशी विनंती केली आहे. त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची विनंती मलेशिया सरकारकडे प्रलंबित आहे. झाकीर नाईकचे 23 आणि 25 मार्च रोजी ओमानमध्ये दोन कार्यक्रम होणार आहेत. याबाबत भारताने ओमान सरकारशी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांच्या हवाल्याने असेही सांगण्यात येत आहे की, झाकीर नाईक सध्या ओमानमध्ये नाही. काही वर्षांपूर्वी वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकवर भारतात कारवाई सुरू झाली तेव्हा त्याने इथून पळ काढला आणि परदेशात फरार झाला  आहे. भारतातून पळून तो आधी ब्रिटनला गेला. जेथे त्याच्या वागणुकीमुळे सरकारने त्याच्या प्रवेशावर बंदी घातली. त्यानंतर झाकीर मलेशियामध्ये गेला. गेल्या तीन वर्षांपासून त्याने मलेशियाला आपला तळ बनवला आहे.

India On Zakir Naik: झाकीरविरोधात रेड कॉर्नर नोटीस

भारतीय तपास यंत्रणा मागील काही वर्षांपासून झाकीर नाईक याच्या मागावर आहे. झाकीरवर भारतात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी आणि रेड कॉर्नर नोटीस जारी होण्यापूर्वीच तो देश सोडून मलेशियाला पळून गेला. तिथे तो सरकारी कार्यालये आणि निवासी इमारतींसह व्हीआयपी परिसरात राहू लागला.

India On Zakir Naik:  परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितले? 

झाकीर नाईक एकदा कतारमध्ये फिफा विश्वचषकादरम्यान दिसला होता. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे एक वक्तव्य समोर आले होते. ज्यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने तो फरार असल्याचे म्हटले होते. त्याला भारतात परत आणण्यासाठी आम्ही मलेशियाशी चर्चा करत आहोत, असं सांगितलं गेलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, “झाकीर नाईक आमच्या कायदेशीर व्यवस्थेतील आरोपी आहे. मलेशियातून त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, भारताने फिफा विश्वचषकासाठी नाईकच्या निमंत्रणाचा मुद्दा कतारसमोर उपस्थित केला होता. प्रत्युत्तरात कतारने नाईकला निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले होते. यासोबतच नाईक याला भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असा दावा बागची यांनी केला. दरम्यान, नाईक 2016 मध्ये भारत सोडून मलेशियाला गेला होता. भारताने मलेशियाकडे त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे.

इतर महत्वाची बातमी: 

Vinod Tawde: देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून विनोद तावडे 'भावी मुख्यमंत्री'? तावडे म्हणाले, नो महाराष्ट्र... ओन्ली राष्ट्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget