(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pralay On LAC : चीनसोबत तणाव सुरु असताना भारतीय वायुसेनेचं 'प्रलय'; राफेल-सुखोईची दिसणार ताकद, S-400 ही तैनात
Indian Air Force: चीनसोबत (China) एकीकडे संघर्ष सुरु असताना पार्श्वभूमीवर आपले हवाई दल (IAF) एक मोठा युद्धसराव करणार आहे. या युद्धसरावात ड्रोन स्क्वाड्रन्सचाही सहभाग असेल. या सरावाला 'प्रलय' (Pralay On LAC) असे नाव देण्यात आले आहे.
Pralay Exercise On LAC : भारत (India) आणि चीन (China) यांच्यात सीमेवर तणाव (India China Border Dispute) कायम आहे. हा तणाव सुरू असतानाच भारतीय हवाई दल (Indian Air Force) युद्धसराव करणार आहे. हवाई दलाकडून (IAF) ईशान्य भागात एक मोठा युद्धाभ्यास (Indian Air Force Exercise) करण्यात येणार आहे. या युद्ध सरावाला 'प्रलय' (Pralay) असे नाव देण्यात आले आहे. हवाई दलाशी संबंधित सुत्रांनी सांगितले की, सर्व प्रमुख एअरबेसमधून युद्धसराव केला जाईल. नुकतंच तैनात करण्यात आलेले S-400 स्क्वाड्रन हे लढाऊ विमानदेखील या युद्धसरावाचा एक भाग असेल.
S-400 एअर डिफेन्स स्क्वाड्रनही तैनात
अलिकडेच भारतीय हवाई दलाने पूर्व सेक्टरमध्ये S-400 एअर डिफेन्स ड्रोन स्क्वाड्रन लढाऊ विमान तैनात केले आहे. हे लढाऊ विमान 400 किमीच्या रेंजमध्ये शत्रूचे कोणतेही विमान किंवा क्षेपणास्त्र नष्ट करू शकते. हे विमान दुरून मारा करण्यास सक्षम आहे. जगातील फार कमी देशांमध्ये S-400 सारखी हवाई संरक्षण यंत्रणा आहे. भारताने रशियासोबत S-400 साठी अब्जावधी डॉलर्समध्ये हा करार केला आहे.
काही महिन्यांमधील दुसरा युद्धसराव
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या 'प्रलय' युद्धसरावात वाहतूक विमाने, लढाऊ विमाने तसेच राफेल आणि सुखोई-30 लढाऊ विमानांसह IAF ची प्रमुख लढाऊ विमानांची ताकद पाहायला मिळणार आहे. अलिकडच्या काही महिन्यांत भारतीय हवाई दलाकडून आयोजित करण्यात आलेला हा दुसरा युद्धाभ्यास आहे.
भारतीय हवाई दलाने काही दिवसांपूर्वी एक ड्रोन स्क्वाड्रन ईशान्येकडे वळवले होते. सिक्कीम आणि सिलीगुडी कॉरिडॉर सेक्टरमधील प्रतिकूल हालचालींवर लक्ष ठेवून आपली क्षमता वाढवण्यासाठी भारतीय हवाई दलाने S-400 या भागात वळवले.
डोकलाम भागात चीनच्या कुरापती वाढल्या
एएनआय वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितले की, सीमाभागात चीनच्या कुरापती अद्यापही सुरुच आहेत. चीन डोकलाम भागातही आपल्या कारवाया वाढवत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा चीनच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहेत.
शिलाँगमधील भारतीय हवाई दलाच्या ईस्टर्न एअर कमांडकडे चीनच्या सीमेवर तसेच संपूर्ण ईशान्येकडे पाळत ठेवण्यासाठी हवाई क्षेत्रे आहेत. अनेकदा जेव्हा चिनी विमाने LAC च्या खूप जवळून उड्डाण करण्याचा प्रयत्न करतात किंवा तेथे भारतीय हवाई क्षेत्रांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लढाऊ विमाने चीनच्या विमानांचा पाठलाग करतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pralay Missile : सीमेवर भारताचा नवा योद्धा 'प्रलय'! शत्रूला भरणार धडकी; केंद्राचं मोठं पाऊल