देशात कोरोना लसीकरणानं गाठला 17 कोटींचा टप्पा, मागील 24 तासात 20 लाख लोकांना लस
गेल्या 24 तासांत देशभरात सुमारे 20 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 17 लाख 84 हजार 869 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत 16 कोटी 94 लाखांहून जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात आतापर्यंत 16,94,39,663 लसीचे डोस देण्यात आले आहे, यात पहिल्या आणि दुसर्या डोसचाही समावेश आहे. त्याचवेळी, 18 ते 44 वयोगटातील 17,84,869 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात कोरोना लसीचे सुमारे 20 लाख डोस देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेच्या 113 व्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी 20,23,532 लसीचे डोस देण्यात आले. पहिला डोस 8,37,695 लोकांना आणि दुसरा डोस 11,85,837 लोकांना देण्यात आला आहे.
8 मे रोजी झालेल्या लसीकरणाची माहिती
- 18,043 आरोग्य सेवा आणि 75,052 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.
- 32,260 आरोग्य सेवा आणि 82,798 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
- 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3,25,811 लोकांना पहिला डोस तर दुसरा डोस 5,23,299 लोकांना देण्यात आला.
- 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1,23,877 लोकांना पहिला आणि 5,47,480 लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस दिला गेला आहे.
- कोरोना लसीचा पहिला डोस 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2,94,912 लोकांना देण्यात आला आहे.
आतापर्यंत भारतात 16,94,39,663 नागरिकांना डोस देण्यात आले असून यात पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे. आतापर्यंत 95,41,654 आरोग्य सेवा आणि 1,39,43,558 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी, 64,63,620 आरोग्य सेवा आणि 77,32,072 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
याशिवाय 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 5,50,75,720 नागरिकांना पहिला आणि 1,48,53,962 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,50,75,720 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे आणि 64,09,465 लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर 18 ते 44 वयोगटातील 17,84,869 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
देशभरात लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. 2 जानेवारीपासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला, ज्यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसोबत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ज्यांना गंभीर स्वरुपाचे आजार आहेत, अशा लोकांचे लसीकरण सुरू झाले. त्याचवेळी, 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येकासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. तर 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे.