India targeted Pakistan Air Defence Systems: लाहोरमध्ये लढाऊ विमान घुसलं तरी पाकिस्तानला ना समजणार, ना दिसणार; भारताने रडार यंत्रणाच उडवली, युद्ध होणार?
India targeted Pakistan Air Defence Systems: भारतातल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले आहेत.

India targeted Pakistan Air Defence Systems: भारताने ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) करून पाकिस्तानला मोठा दणका दिला. मात्र अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. भारताने पाकिस्तानला आणखी एक खूप मोठा दणका दिलाय.पाकिस्तानच्या लाहोर शहराचं रक्षण करण्यासाठी लावलेली एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त (India targeted Pakistan Air Defence Systems) केली. भारतीय लष्कराने प्रेस नोट जारी करून ही घोषणा केल आहे.
भारताचं लढाऊ विमान लाहोरमध्ये घुसलं तरी ना समजणार, ना दिसणार-
पाकिस्तानने चीनची एचक्यू 9 ही एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली होती, ती भारताने हल्ला करून बेचिराख करून टाकली. त्यामुळे लाहोर या महत्त्वाच्या शहरावरचं हवाई छत्रच नष्ट झालं आहे. भारताच्या या कारवाईमुळे भारताला लाहोरपर्यंत मोकळं रान मिळालं आहे. आता भारतीय विमानं लाहोरपर्यंत पोहोचली तरी रडारवर त्यांचा माग काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे सुखोई आणि राफेलसारख्या वेगवान विमानांना आता कमी धोका असेल. त्यामुळे आता पाकिस्तानने हल्ला केल्यास भारतीय हवाईदलाची विमाने लाहोरपर्यंत जाऊन कधीही बॉम्बफेक करु शकतील. हे भारताच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे.
भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले-
भारतातल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले आहेत. भारताच्या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टममुळे पाकिस्तान तोंडावर पडला. पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर केलेला हल्ला भारताच्या एस 400 या एअर डिफेन्स सिस्टीमने उधळून लावलाय. काल रात्री वायुदलाने पाकिस्तानातून येणारा हल्ला एस 400 या एअर डिफेन्स सिस्टीमने नेस्तनाबूत केला. एअर डिफेन्स सिस्टीम असलेल्या भारताच्या युनिटचं नाव सुदर्शन चक्र असं आहे. भारताने नेमकं सुदर्शन चक्र पाकिस्तानवर सोडत पाकिस्तानी हल्ला निष्प्रभ केला. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिलीय. मात्र याबाबत अजून अधिकृत सरकारी घोषणा झालेली नाही. भारताच्या एस 400 या सिस्टीमने पाकिस्तानातून आलेली सर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन उडवून लावले.
पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण-
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण पहायला मिळतंय. पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादसह अनेक प्रमुख शहरांमध्ये पाकने सायरन वाजवले. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारतीय वायूदलाकडून हल्ला केला जाण्याची पाकला भीती वाटतेय. त्याच पार्श्वभूमीवर पाककडून सायरन वाजवून पाकिस्तानी नागरिकांना अलर्ट दिला जात आहे.
भारताने उद्ध्वस्त केलेली पाकिस्तानची ह HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा नेमकी काय?
- HQ-9 ही चीनने (CPMIEC) विकसित केलेली सुरक्षा यंत्रणा आहे.
- हवाई हल्ले रोखणे आणि प्रतिकार करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते.
- एकाचवेळी 100 टार्गेट ट्रॅक करुन ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या यंत्रणेची होती, हीच यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली
- जमिनीवरुन हवेत मारा करणारी (Surface-to-Air Missile – SAM) क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे.
- ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते.
- 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केला होता.
- राफेल, सुखोई आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या भारताच्या हवाई धोक्यांना रोखसाठी पाकिस्तानने चीनकडून यंत्रणा घेतली होती.
- लाहोरमधील रडार यंत्रणा भारताने उद्धवस्त केल्यामुळे आता भारतीय विमानं लाहोरपर्यंत पोहोचली तरी रडारवर त्यांचा माग काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे सुखोई आणि राफेलसारख्या वेगवान विमानांना आता कमी धोका असेल. त्यामुळे आता पाकिस्तानने हल्ला केल्यास भारतीय हवाईदलाची विमाने लाहोरपर्यंत जाऊन कधीही बॉम्बफेक करु शकतील.
























