India Vaccination : नवा उच्चांक! देशातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या निम्म्या लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस
India Corona Vaccination : देशात लसीकरणानं नवा उच्चांक स्थापित केला आहे. देशातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या निम्म्या लोकसंख्येला कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
India Corona Vaccination : देशात लसीकरणानं नवा उच्चांक स्थापित केला आहे. देशातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या निम्म्या लोकसंख्येला कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. भारत सरकारनं ही माहिती दिली आहे. आतापर्यंत देशामध्ये देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 127.61 कोटी अँटी-कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत.
🇮🇳India's vaccination drive achieves another milestone🎇
— PIB India (@PIB_India) December 5, 2021
Over 50% of the eligible population are now fully vaccinated💉
Together, let's defeat #COVID19‼️ #HarGharDastak #IndiaFightsCorona pic.twitter.com/c69ikxCK37
कोराना विरुद्धच्या युद्धात भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. देशातील पात्र लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
India achieved another milestone in the war against #COVID19! Administered both doses to 50 percent of the eligible population of the country. #HarGharDastak pic.twitter.com/Le7trCBanC
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 5, 2021
भारतात सध्या 99,155 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 1 टक्क्यांहून कमी आहेत, सध्या हे प्रमाण 0.29 टक्के आहे जे मार्च 2020 पासून सर्वात कमी आहेत. गेल्या 24 तासांत 6,918 रुग्ण बरे झाले असून, देशभरात आतापर्यंत 3,40,60,774 रुग्ण बरे झाले आहेत.
#COVID19 Updates
— PIB India (@PIB_India) December 5, 2021
127.61 cr vaccine doses have been administered so far
6,918 recoveries in the last 24 hours
Daily positivity rate (0.73%)
Read: https://t.co/7NFTgl47Iy#IndiaFightsCorona #LargestVaccinationDrive pic.twitter.com/SMc1oaFqOL
गेल्या 24 तासांत 8,895 नवीन रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 0.73 टक्के आहे, गेल्या 62 दिवसांपासून हा रेट 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 0.80 टक्के आहे; गेल्या 21 दिवसांपासून हा दर 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशात आजपर्यंत एकूण 64.72 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.