(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओमायक्रॉनमुळे भारतात पहिला मृत्यू - रिपोर्ट
Omicron variant : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढली आहे.
Omicron variant : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट अधिक धोकादायक नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र, भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार राज्यस्थानमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाला आहे.
भारतामध्ये ओमायक्रॉन रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. बुधवारी देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 2135 वर गेली आहे. देशात या व्हेरियंटचे 24 राज्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळ या राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 653, दिल्लीत 464 आणि केरळात 185 रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे.
देशात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; 58 हजारांहून अधिक रुग्ण -
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 58 हजार 97 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2135 रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीन जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 14 हजार 4 वर पोहोचली आहे. या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 551 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (मंगळवारी) 15 हजार 389 रुग्ण ठिक झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
Omicron Variant Testing Kit : ओमायक्रॉनचं निदान करणारी किट 'ओमीशुअर'ला ICMR ची मंजुरी
Coronavirus Omicron Variant : लहान मुलांना देखील ओमायक्रॉनचा धोका? पाहा काय म्हणाले तज्ज्ञ
ओमायक्रॉनची लाट म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड; शास्त्रज्ञांचा दावा