(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus New Cases : देश अलर्ट मोडवर, 24 तासांत आढळले 8,309 नवे रुग्ण
New Covid-19 Cases : मागील 24 तासांत देशात 8 हजार 309 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 9 हजार 905 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
New Covid-19 Cases : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रोन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ माजवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ओळखून देशांमध्ये सतर्कतेचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त करत उपाययोजनाची चचपणी करण्याचा आदेश दिलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 8 हजार 309 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 9 हजार 905 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्याची देशातील कोरोना स्थिती काय आहे?
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 122 कोटी 41 लाख डोस देण्यात आले आहेत.
देशाचा रोगमुक्ती दर सध्या 98.34% आहे; मार्च 2020 पासूनचा सर्वात उच्चांकी दर
गेल्या 24 तासात 9,905 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण कोरोनामुक्तांची संख्या वाढून 3,40,08,183 झाली आहे.
गेल्या 24 तासात 8,309 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतात सध्या 1,03,859 कोविड सक्रीय रुग्ण झाले आहेत. ही गेल्या 544 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या.
कोविड सक्रीय रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमी असून सध्या हे प्रमाण 0.30% इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण.
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.09%) गेले 56 दिवस हा दर 2% हून कमी
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.85%) गेले 15 दिवस हा दर 1% हून कमी.
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 64 कोटी 2 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील स्थिती काय आहे?
राज्यात आज 832 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 81 हजार 640 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के आहे. राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8,193 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 85 हजार 874 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1043 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,53,57,358 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66,34,444 (10.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत 217 रुग्णांची नोंद तर चार जणांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 217 रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकूण 247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढून 2658 इतका झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचा साप्ताहिक कोरोना वृद्धी दर 0.02 'टक्क्यांवर आला आहे. त्या आधी तो 0.03 टक्के इतका होता. गणेशोत्सवानंतरच्या काळात तो 0.06 टक्क्यांवर पोहोचला होता.