Coronavirus Updates : देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली; अर्ध्याहून अधिक रुग्ण एकट्या केरळमध्ये
India Coronavirus Updates : देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये अर्ध्याहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
India Coronavirus Updates : सलग दोन दिवस 20 हजारांच्या आत आलेल्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात एकूण 23 हजार 529 रुग्णांची नोंद झाली आहे तर 311 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 28 हजार 718 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये अर्ध्याहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्या आधी मंगळवारी देशात 18 हजार 870 नव्या रुग्णांची नोंद झाली होती तर 378 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून बुधवारी 12 हजार 161 रुग्णांची भर पडली तर 155 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये काल 17 हजार 862 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
देशातील सध्याची कोरोना स्थिती :
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 37 लाख 39 हजार 980
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 30 लाख 14 हजार 898
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : दोन लाख 77 हजार 020
- एकूण मृत्यू : चार लाख 48 हजार 062
- देशातील एकूण लसीकरण : 87 कोटी 66 लाख 63 हजार 490 डोस
राज्यातील स्थिती
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 49 जणांचा मृत्यू झाला. राज्यात काल 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 63 लाख 68 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.
Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू