(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona vaccination: देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता
Corona vaccination: भारतात आता कोरोना लसीकरणानं चांगलाच जोर धरला आहे. भारतात एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
Corona vaccination: कोरोना व्हायरसच्या (Corona virus) तिसऱ्या लाटेची (Third wave) शक्यता व्यक्त केली जात असताना भारतात आता कोरोना लसीकरणानं चांगलाच जोर धरला आहे. भारतात एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण डोस दिलेल्या लोकांची संख्या 88 कोटींवर पोहोचली आहे. दुसरीकडे कोरोनाची आणखी एक लस 2 ऑक्टोबर रोजी मिळेल अशी शक्यता आहे.
कोणत्या राज्यात किती लसीकरण
देशातील चार मोठ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातनं 6 कोटींहून अधिक लोकांना लस दिली आहे. यात गुजरात (40 टक्के), मध्य प्रदेश (27 टक्के) आणि महाराष्ट्र (26 टक्के) लसीकरण झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये 13.34 टक्के युवकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
4 राज्यांमध्ये 5 कोटींहून अधिकांना लस
तर पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक आणि बिहार राज्यांमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. कर्नाटक (35 टक्के) आणि राजस्थानमध्ये (30 टक्के) तर पश्चिम बंगाल (23 टक्के) आणि बिहारमध्ये (14 टक्के) लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
आणखी एक लस येणार
केंद्र सरकार आणि झायडस कॅडिलाकडून या आठवड्यात कोरोना प्रतिबंधक डीएनए वॅक्सिन झायकोव-डीची किंमत ठरवण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी ही लस देशात लॉन्च होऊ शकते. भारतीय औषध नियामक मंडळाकडून झायडस कॅडिलाच्या स्वदेशी सुई मुक्त लसीला मंजूरी दिली आहे. ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे.
Novavax Vaccine : सीरम इन्स्टिट्युट नोव्हावॅक्स लसीची जुलैमध्ये मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु करण्याची शक्यता
देशातील लहान मुलांना देखील लसीकरण केलं जाणार
संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधातील (Corona in India) लढाई नेटानं लढली जात आहे. देशात कोरोनावरील (Corona vaccination) लसीकरण वेगानं होऊ लागलं आहे. आतापर्यंत 18 वर्षांवरील लोकांना लसीकरण केलं जात आहे. आता देशातील लहान मुलांना देखील लसीकरण केलं जाणार आहे. यासाठीची तयारी सुरु झाली आहे. आता लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी कोविड लसीकरणाची ट्रायल सुरु आहे. त्यामुळं लवकरच लहान मुलांसाठी लस येण्याची आशा निर्माण झाली आहे. आधी 12 वर्षांवरील मुलांवर ट्रायल सुरु केल्यानंतर आता 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीकरणाच्या ट्रायलला सीरम इंन्स्टिट्यूटला परवानगी मिळाली आहे.