India Pakistan War Ceasefire Violations LIVE Updates: जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास विभागाची जवळपास 20 स्लीपर ठिकाणी छापेमारी
India Pakistan War Ceasefire Violations LIVE Updates: शनिवारी (10 मे 2025) भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली, पण काही तासांतच पाकिस्ताननं ती मोडली.

Background
India Pakistan War Ceasefire Violations LIVE Updates: परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी (10 मे 2025) रोजी रात्री अचानक एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं की, पाकिस्ताननं आज दुपारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात जमीन, हवाई आणि समुद्र या दोन्ही ठिकाणी सर्व प्रकारच्या गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यासाठी झालेल्या द्विपक्षीय कराराचं उल्लंघन केलं आहे. चार दिवसांच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्ताननं युद्धबंदीवर सहमती दर्शविल्यानंतर काही तासच उलटले होते. त्यानंतर काही काळातच ही घटना घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार झाला. तसेच, पीर पंजाल परिसरातही ड्रोन दिसत असल्याची माहितीही त्यांनी दिली. संरक्षण सूत्रांनी सांगितलं की, ड्रोन आले आणि गोळीबार झाला, पण, सध्या नियंत्रण रेषेवर गोळीबार होत नाही."
भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यासाठी झालेल्या कराराची माहिती सर्वप्रथम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून मिळाली, ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की, अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेल्या चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तान 'पूर्ण आणि तात्काळ' युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. दरम्यान, उच्च सरकारी सूत्रांनी स्पष्टपणे सांगितलं की, हा निकाल भारत आणि पाकिस्तानी बाजूंमधील थेट चर्चेचा परिणाम होता आणि पाकिस्ताननं 'कोणत्याही अटीशिवाय' आणि 'इतर मुद्द्यांशी कोणताही संबंध न ठेवता' त्यावर सहमती दर्शविली होती.
India Pakistan Ceasefire LIVE: शस्त्रसंधीची इनसाइड स्टोरी
India Pakistan Ceasefire LIVE: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीची इनसाइड स्टोरी
9 मे
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं भारत-पाक तणावात आमचा काय संबंध? असं वक्तव्य
काही तासांतच जेडी व्हान्स यांनी भूमिका बदलत संघर्षात लक्ष
व्हान्स,परराष्ट्रमंत्री रुबिया मार्को आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुसी विलेस यांच्या बैठका
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचे संघर्षासंबंधी धोकादायक इनपुट
व्हान्स यांच्याकडून ट्रम्प यांना शस्त्रसंधीच्या प्लॅनची माहिती
ट्रम्पसोबतच्या चर्चेनंतर व्हान्स यांचा भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन
10 मे
पंतप्रधान शरीफ यांनी अण्वस्त्र सांभाळणाऱ्या नॅशनल कमांड ऑथरिटीची बैठक
दोन्ही देशांत अण्वस्त्रयुद्ध सुरु होऊ शकतं अशी व्हान्स आणि रुबिओंना भीती
पाकनं 400 ड्रोन्सचा हल्ला आणि भारताचे प्रत्युत्तर यामुळं व्हान्स,रुबिओ चिंतीत
रावळपिंडीतल्या नूर खान या एअर बेसवर भारताचा हल्ला, जवळच पाकचा अण्वस्त्रसाठा
पाकिस्तानकडे 170 हून अधिक अण्वस्त्रांचा साठा
भारताच्या पुढच्या हल्ल्यानं अण्वस्त्रांचं रेडिएशन पाकमध्ये पसरण्याची भीती
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीरला फोन
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना रुबियो मार्कोंचा फोन
सायं. 5.33 वा. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक्स पोस्ट करत शस्त्रसंधीची घोषणा
Operation Sindoor LIVE Updates: जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास विभागाची जवळपास 20 स्लीपर ठिकाणी छापेमारी
Operation Sindoor LIVE Updates: जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास विभागानं जवळपास 20 स्लीपर ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये अनेक स्लीपर सेल उद्ध्वस्त करण्यात आले. तांत्रिक गुुप्तचर माहितीच्या आधारी दक्षिण काश्मीरच्या 4 जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. पडकलेल्या स्लीपर सेल सदस्यांकडे आक्षेपार्ह साहित्य देखील सापडलं. अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून, तिथल्या पोलिसांनी कठोर कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.























