एक्स्प्लोर
जगातील टॉप 10 श्रीमंत देशांची यादी, भारताचा नंबर....!
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत देशांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत भारताचंही स्थान आहे. भारत सध्या सातव्या स्थानावर असून, भारताकडे 5600 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.
'न्यू वर्ल्ड वेल्थ'च्या अहवालानुसार श्रीमंत देशांच्या यादीत भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इटलीच्याही पुढे आहे.
जगातील सर्वात श्रीमंत देशाचा मान अमेरिकेला मिळाला असून त्याची संपत्ती 48,900 अब्ज डॉलर एवढी आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनची संपत्ती 17,400 अब्ज डॉलर आहे, तर 15,100 अब्ज डॉलरसह जपान तिसऱ्या स्थानावर आहे.
या यादीत ब्रिटनचा चौथा क्रमांक लागला असून त्याची संपत्ती 9200 अब्ज डॉलर इतकी आहे, तर 9100 अब्ज डॉलर संपत्तीसह जर्मनी पाचव्या स्थानावर आहे. सहाव्या स्थानावरील फ्रान्सची संपत्ती 6600 अब्ज डॉलर एवढी आहे.
या श्रीमंत देशांची यादी बनवताना फक्त नागरिकांच्या संपत्तीचा विचार न करता, देशातील सर्व प्रकारच्या स्थावर मालमत्ता, रोख रक्कम आणि व्यावसायिक उत्पन्नाचा विचार करण्यात आला आहे. तसंच यात सरकारी फंडांचा विचार करण्यात आलेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement