India Coronavirus Cases : दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट 98.50 टक्के
India Coronavirus Cases : सोमवारी नोंदवलेल्या नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या कमी आहे.
India Coronavirus Cases : भारतात एका दिवसात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे 13,615 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील संक्रमितांची संख्या 4,36,52,944 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,31,043 वर पोहोचली आहे. सोमवारी नोंदवलेल्या नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या कमी आहे.
बरे होण्याचा दर 98.50 टक्के
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी 20 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतात मृतांची संख्या 5,25,474 झाली आहे. देशात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,31,043 वर पोहोचली आहे, जी एकूण रूग्णसंख्येच्या 0.30 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 330 ने वाढली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा दर 98.50 टक्के आहे.
'या' काळात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढला
विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशात संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण रुग्णसंख्या 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली होती.
#COVID19 | India reports 13,615 fresh cases, 13,265 recoveries and 20 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 12, 2022
Active cases 1,31,043
Daily positivity rate 3.23% pic.twitter.com/ndhj0GX7IR
25 जानेवारीला रूग्णसंख्येचा चार कोटींचा आकडा पार
19 डिसेंबर 2020 रोजी देशात कोरोना रूग्णसंख्या एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी, 4 मे रोजी, संक्रमितांची संख्या 20 दशलक्ष आणि 23 जून 2021 रोजी ती 30 दशलक्ष ओलांडली होती. यावर्षी 25 जानेवारीला या प्रकरणांनी चार कोटींचा आकडा पार केला होता.
मुंबईतील रुग्णसंख्येत घट
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 235 नवे कोरोनाबाधित आढळले असून 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Covid-19 Vaccination : 5-12 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा; कॉर्बेवॅक्स, कोवॅक्सिन लसीच्या वापराला मंजुरी
- Mumbai Corona Update : मुंबईत शनिवारी 499 रुग्णांची नोंद, 811 कोरोनामुक्त
- Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्या काहीशी घसरली, आज 2760 रुग्णांची नोंद तर पाच रुग्णांचा मृत्यू