एक्स्प्लोर

India Corona Cases : देशात काल दिवसभरात 9765 रुग्णांची नोंद, तर 477 मृत्यू

India Corona Cases Update : देशात काल दिवसभरात 9765 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 46 लाख 06 हजार 541 जणांना कोरोनाची लागण.

India Corona Cases Update : संपूर्ण जग कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनशी (Omicron) झुंज देत आहे. जगभरातील 25 देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, अद्याप भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. असं असलं तरी जगभरातील ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळं प्रशासनानं सतर्कता बाळगली आहे. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. देशात काल दिवसभरात 9765 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 46 लाख 06 हजार 541 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 477 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 69 हजार 724 वर पोहोचला आहे. तसेच सध्या देशात 99,763 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, ज्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. 

राज्याचा रिकव्हरी रेट 97.71 टक्क्यांवर

कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (बुधवार)  767 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर  903 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 84 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. राज्यात काल (बुधवार) 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7591  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 812  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 923 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 56 , 19, 951 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे.

India Corona Cases : देशात काल दिवसभरात 9765 रुग्णांची नोंद, तर 477 मृत्यू

Omicronच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क, RTPCR निगेटिव्ह आणि लसीकरण अनिवार्य

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं (Omicron Variant) जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्याने देखील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्यात.  देशांतर्गत प्रवासासाठी 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे. लशीच्या दोन डोसच्या प्रमाणपत्रासह मुंबई विमानतळावर कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा असून आरटीपीसीआर रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोरोना चाचणी केली जाणार आहे.  

1. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर आल्यानंतर आरटीपीसीआर करणं बंधनकारक, कोणत्याही देशाचा असला तरी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
2. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटीव्ह आला तरी 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार 
3. मुंबईहून कनेक्टिंग फ्लाईटकरता देखील आरटीपीसीआर करणं बंधनकारक, डोमेस्टिक प्रवाशांनाही RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य
4. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक डॉमेस्टिक फ्लाईटमधील प्रवाशांना 48 तासाआधी आरटीपीसीआर चाचणी अहवाल करणं बंधनकारक
5. राज्यांतर्गत शहरांमध्ये प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक 
6. दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल तर RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य

कोणत्या देशांमध्ये आढळले ओमिक्रॉन बाधित?

बोत्सवानामध्ये 19, दक्षिण आफ्रिकेत 77, नायजेरियामध्ये 3, यूकेमध्ये 22, दक्षिण कोरियामध्ये 5, ऑस्ट्रेलियामध्ये 7, ऑस्ट्रियामध्ये 1, बेल्जियममध्ये 1, ब्राझीलमध्ये 3, चेक रिपब्लिकमध्ये 1, फ्रान्समध्ये 1, जर्मनीमध्ये 9 , हाँगकाँगमध्ये 4, इस्रायलमध्ये 4, इटलीमध्ये 9, जपानमध्ये 2, नेदरलँडमध्ये 16, नॉर्वेमध्ये 2, स्पेनमध्ये 2, पोर्तुगालमध्ये 13, स्वीडनमध्ये 3, कॅनडात 6, डेन्मार्कमध्ये 4,  अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये  प्रत्येकी एक बाधित आढळले आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण, गरोदर महिलांना व्हायरसचा धोका अधिकVijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दीABP Majha Headlines : 06 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल;  लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
Embed widget