मॉस्कोत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधी पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये गोळीबार; 100 ते 200 राऊंड फायर
10 सप्टेंबर रोजी मॉस्कोत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर आणि चिनचे परराष्ट्रमंत्री समकक्ष वांग यी यांच्या भेटीआधी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ गोळीबाराची घटना घडली होती.
![मॉस्कोत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधी पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये गोळीबार; 100 ते 200 राऊंड फायर India China Ladakh Standoff India China Fired 100-200 Warning Shots At Pangong In Early September Reports मॉस्कोत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधी पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये गोळीबार; 100 ते 200 राऊंड फायर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/16173209/India-China.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विवध स्तरांवर चर्चा केल्या जात आहेत. अशातच दोन्ही देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी. मॉस्कोत भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, 10 सप्टेंबर रोजी मॉस्कोत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर आणि चिनचे परराष्ट्रमंत्री समकक्ष वांग यी यांच्या भेटीआधी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना अत्यंत तीव्र आणि मोठी असल्याचं समोर आलं आहे.
पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळील एलएसीवर वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा गोळीबार करण्यात आला होता. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या एलएसीजवळ 100 ते 200 गोळ्यांचं राऊंड फायरिंग करण्यात आलं. तसेच ही फायरिंग एकमेकांवर न करता हवेत करण्यात आली असल्याचीही माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचे जवळपास 50 हजार सैनिक पूर्व लडाखजवळ असलेल्या एलएसीवर तैनात आहेत. भारतानेही मिरर-डिप्लोयमेंट करत, चीनच्या बरोबरीने सैन्य एलएसीवर तैनात केलं आहे. दरम्यान, दोन देशांमध्ये पार पडलेल्या ब्रिगेडियर स्तराच्या बैठकीत काहीही तोडगा न निघाल्यामुळे येत्या काही दिवसांत कोअर कमांडर स्तराची बैठक बोलावण्यात येणार आहे.
चीनचा लडाखमधील सुमारे 38000 चौरस किलोमीटर जागेवर अनधिकृत कब्जा : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
भारत-चीन सीमा वाद हा गंभीर प्रश्न आहे. दोन्ही देश शांततेत हा प्रश्न मिटवण्यावर सहमत आहेत. केवळ शांततापूर्ण संवादच या वादाचं निराकरण करेल. चीनने अनेक वेळा एलएसीवर स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या सैनिकांनी त्यांना यात सफल होऊ दिलं नाही, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. ते लोकसभेत बोलत होते.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन आपल्या सैनिकांची भेट घेतली. आपण सैनिकांच्या सोबत उभे आहोत हा संदेश यातून सर्वांना दिला. मी सुद्धा लडाखला गेलो आणि सैनिकांना प्रोत्साहन दिलं. चीनने लडाखमधील सुमारे 38000 चौरस किलोमीटर जागेवर अनधिकृत कब्जा केला आहे, याची सर्वांना माहिती आहे. तसेच 1963 मध्ये तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने पीओकेची 5180 चौरस किलोमीटरची जमीन बेकायदेशीरपणे चीनला दिली, असं राजनाथ सिंह म्हणाले.
सीमा वाद: चीनच्या कटाला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं, लोकसभेत राजनाथ सिहांचं वक्तव्य
देशाचं सुरक्षा दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
देशाचं सुरक्षा दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा प्रयत्न आपल्या सैनिकांनी उधळून लावला. यामध्ये आपले अनेक सैनिक शहीद झाले. त्याचवेळी चीनचंही मोठं नुकसान झालं. दोन्ही देशांनी एलएसीचा आदर केला पाहिजे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)