India-China Border | लडाखमध्ये भारताची आगेकूच, भारतीय सैन्य फिंगर 4 वर
भारतीय सैनिक आता लडाखमधील फिंगर 4 वर पोहोचले असून इथे ते चिनी सैनिकांच्या अगदी समोरासमोर आहेत. फिंगर 4 वर चिनी सैनिकांनी आधीच ताबा मिळवला होता, आता भारतीय सैनिकही तिथे पोहोचले आहेत.
लडाख : भारतीय सैनिक आता लडाखमधील फिंगर 4 वर पोहोचले असून इथे ते चिनी सैनिकांशी आय-बॉल-टू-आय-बॉल म्हणजे अगदी समोरासमोर आहेत. फिंगर 4 वर चिनी सैनिकांनी आधीच ताबा मिळवला होता, आता भारतीय सैनिकही तिथे पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आता भारतीय सैन्याने तिथे अशा पोझिशनवर ताबा मिळवला आहे, जो फिंगर 4 पेक्षाही उंचीवर आहे. खरंतर चिनी सैनिक फिंगर 4 वरुन मागे हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे भारतीय सैनिकही तिथे पोहोचले आहेत. त्यामुळे पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही परिसरातही भारतीय सैनिकांनी मोठी कूच केली आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्याने म्हटलं होतं की, पँगाँग-त्सो लेकच्या उत्तरेला सैनिकांच्या तैनातीला रि-अॅडजस्टमेंट केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने पँगँग-त्सो लेकच्या दक्षिणेत ज्या ज्या टेकड्यांवर (गुरंग हिल, मगर हिल, मुखपरी, रेचिन ला) ताबा मिळवला आहे, तिथे तिथे आपल्या कॅम्पच्या चहूबाजूंनी वायर ऑब्स्टिकल लावल्या आहेत. ही ताराबंदी पार करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारच भारताने चिनी सैन्याला दिला आहे.
सोमवारी संध्याकाळी चिनी सैनिका याच्या अगदी जवळ आले होते आणि त्यांनी ताराबंदी काढण्याचा प्रयत्नही केला होता. यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना कठोर इशारा दिला आणि मागे हटले नाहीत तर परिणाम गंभीर होतील असंही म्हटलं. यानंतर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार करुन भारतीय सैनिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परतु भारतीय सैनिकांच्या कठोर इशाऱ्यानंतर चिनी सैन्याला मागे हटावं लागलं.
चीनचे 50 हजार सैनिक तैनात एका अंदाजानुसार, चीनचे सुमारे 50 हजार सैनिक पूर्व लडाखजवळ एलएसीवर तैनात आहेत. भारतानेही इथे मिरर-डिप्लॉयमेंट केली आहे, म्हणजेच चीनच्या बरोबरीने 50 हजार सैनिक तैनात केले आहेत. कारण ब्रिगेडियर स्तरावरील बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे येत्या काही दिवास कोअर कमांडर स्तरावरील बैठक होण्याची शक्यता आहे.
लेहमध्ये हवाई दलाकडून नाईट कॉम्बॅट एअर पेट्रोलिंग सुरु आहे. म्हणजेच दिवसाच नाही तर राक्षीही हवाई दलाचे लढाऊ विमान निगराणी करत आहेत.
भारतीय, चिनी सैन्याच्या कमांडरची भेट भारत आणि चीनच्या सैन्यातील कमांडर यांची बुधवारी (9 सप्टेंबर) पूर्व लडाखमध्ये भेट झाली. सीमेवरील तणाव आणखी वाढण्यापासून रोखण्याच्या उपाययोजांनाबाबत 'हॉटलाइन'वर बातचीत केली. मास्कोमध्ये शांघाय सहकार संघटनेच्या वतीने भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला हे पाऊल उचलण्यात आलं.
पूर्व लडामध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे आणि चिनीच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) 30 ते 40 सैनिक पूर्व लडाखमध्ये रेजांग-ला रीजलाईनमध्ये एका भारतीय चौकीजवळच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत.