चीनचं कारस्थान! पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंसह देशातील अनेक बड्या लोकांची हेरगिरी
भारतामध्ये चीनच्या हेरगिरीबाबत मोठी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. चीनकडून आता केवळ एलएसीवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कारस्थान रचलं जात आहे.
![चीनचं कारस्थान! पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंसह देशातील अनेक बड्या लोकांची हेरगिरी China Spying on India VIP and Diplomats acquired details of more than 1350 people reports चीनचं कारस्थान! पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंसह देशातील अनेक बड्या लोकांची हेरगिरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/14152140/modi-chaina-UT.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: भारतामध्ये चीनच्या हेरगिरीबाबत मोठी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. चीनकडून आता केवळ एलएसीवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कारस्थान रचलं जात आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार चीनकडून भारतातील मोठ्या संविधानिक पदांवरील राजकीय नेते तसेच लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरु असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे 1350 लोकांची हेरगिरी सुरु असल्याची माहिती आहे.
देशभरातील बड्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पाच मंत्री, माजी आणि आजी 40 मुख्यमंत्री, 350 खासदार, कायदेतज्ञ, आमदार, महापौर, सरपंच आणि लष्करातील काही अधिकारी अशा जवळपास 1350 लोकांची हेरगिरी सुरु आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्यासह देशातील काही पत्रकारांचा देखील समावेश आहे, अशी माहिती आहे.
चीनची शेनझेन आणि झेन्हुआ इन्फोटेक करत आहे हेरगिरी
चीनची शेनझेन आणि झेन्हुआ इन्फोटेक ही कंपनी हेरगिरी करत असल्याची माहिती आहे. शेनझेन इन्फोटेक कंपनी ही हेरगिरी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारसाठी करत असल्याची माहिती आहे. या कंपनीचं काम दुसऱ्या देशांवर नजर ठेवणं आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंसह 24 मुख्यमंत्र्यांचा समावेश
चीनच्या या कंपनीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह सध्याच्या एकूण 24 मुख्यमंत्र्यांची हेरगिरी सुरु आहे. या लिस्टमध्ये 16 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
कोणकोणत्या लोकांची हेरगिरी? पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सीडीएस जनरल बिपीन रावत चीफ जस्टिस ऑफ इंडिया एसए बोबडे 24 मुख्यमंत्री 16 माजी मुख्यमंत्री 350 खासदार 70 महापौर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)