एक्स्प्लोर

FDC Medicine Ban : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी

Central Government Ban 14 Medicine : केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांमुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्याचं समोर आल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

India Bans 14 FDC Medicine : केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs Controller General of India) आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी, 3 जून रोजी हा नवा निर्णय जारी केला आहे.

भारताकडून14 औषधांवर बंदी

भारत सरकारने 14 प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC - Fixed Dose Medicine) औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने आता 14 प्रकारच्या FDC कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.

औषधे मानवी आरोग्यास घातक असल्याचं समोर

डीजीसीआय (DCGI) च्या तज्ज्ञ समितीने आधी 14 प्रकारची FDC कॉम्बिनेशन असणारी औषध मानवी आरोग्यासाठी घातक असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. डीसीजीआयने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल उचलत या औषधांवर बंदी घातली आहे.

फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषध म्हणजे काय?

दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळलेले असणे म्हणजे फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC - Fixed Dose Medicine) होय. यामध्ये Nimesulide + Paracetamol dispersible गोळ्या आणि Pholcodine + Promethazine या सारख्या घटकांचा समावेश आहे. 

कॉकटेल ड्रग

केंद्र सरकारने शुक्रवारी 14 फिक्स्ड-डोज कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर उपचारात्मक स्पष्टता नसल्याच्या कारणावरुन बंदी घातली आहे. फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDCs) ही अशी औषधे, ज्यामध्ये एका गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधे एकत्र असतात. यानांच 'कॉकटेल' (Cocktail Drug) औषधे असंही म्हटलं जातं.

डीजीसीआयच्या मागणीनंतर केंद्राचं मोठं पाऊल

या औषधांच्या उपचाराबाबत कंपनीला स्पष्टीकरण नसल्याने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय या औषधांमुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचंही डीसीजीआयच्या तज्ज्ञ समितीला आढळून आलं होतं. त्यानंतरच डीजीसीआय (DCGI) तज्ज्ञांच्या पॅनेलने त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

या औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ''तज्ज्ञ समितीने या औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या औषधांच्या उपचारात्मकतेबाबत स्षटता नाही आणि यामुळे मानवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या 14 FDCs औषधांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे". असं सांगितलं आहे. तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींच्या आधारे हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Online Medicine App : विनापरवाना औषधं विकणं महागात, ई-फार्मसींना DCGI ची कारणे दाखवा नोटीस

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वरGondia Mobile Bomb :  तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाचParag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखलSpecial Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Embed widget