India Pakistan War: भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले, जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी करुन दाखवली
India Pakistan War attack: भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट; कराची बंद उद्ध्वस्त. पाकिस्तानने खूप मोठा हवाई हल्ला केला होता. मात्र, भारताने हल्ला परतावला.

India Attacks on Pakistan: ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला पुन्हा एकदा डिवचणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली आहे. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमारेषेवर असलेल्या 15 शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले.
प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानने नियंत्रण रेषेलगत विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळांवर आणि शहरांवर स्वार्म ड्रोन्सने हल्ले केले. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे सर्व हल्ले परतावून लावले आहेत. भारताने पाकिस्तानचे जवळपास 50 ड्रोन्स पाडले आहेत. पाकिस्ताने भारताच्या उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा, राजौरी आणि पठाणकोट या भागात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला होता. तसेच पाकिस्तानची अनेक ड्रोन्सही भारतावर हल्ला चढवण्यासाठी आली होते. मात्र, भारताच्या एस -400 या डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानं पाडली. याशिवाय, एल 70 गन, Zu-23mm आणि शिल्का यंत्रणेनेही पाकिस्तानचे रॉकेट हल्ले परतावून लावले.
पाकिस्तानचा एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र भारताला फार मोठे नुकसान पोहोचवू शकलेला नाही. पाकिस्तानकडून अविरत क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या साहाय्याने हल्ला सुरु असतानाही भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने सर्व मिसाईल्स आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केली होती. या कामगिरीमुळे भारतीय हवाईदलाची ताकद किती मोठी आहे, याचा प्रत्यय जगाला आला आहे.
Yesterday night, when Pakistan made failed attempts to send swarm drones all across various places along the Line of Control (LoC) and International Borders (IB), over 50 drones were successfully neutralized during a large-scale counter-drone operation conducted by Indian Army… pic.twitter.com/x2pJE16940
— ANI (@ANI) May 9, 2025
Karachi Port Attack: कराची बंदरावर आयएनएस विक्रांतचा हल्ला
भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान आता भारताच्या आयएनएस विक्रांतची (INS Vikrant) एन्ट्री झाली आहे. भारतानं पाकिस्तानला कराचीत (Karachi Port) देखील मोठा दणका दिला. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची (Karachi) बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले. 14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं. तसेच कराची बंदराचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितलं जात आहे.
पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला?
- भारतावर ड्रोन हल्ले केले, पण सगळे अपयशी ठरले
- लढाऊ विमाने पाठवली, एकही यशस्वी झालं नाही
- चार लढाऊ विमाने भारताने लगोलग पाडली
- कराची पोर्ट उद्ध्वस्त
- राजधानी इस्लामाबादेत हल्ले
- पंतप्रधानाच्या घराबाहेर हल्ले, बंकरमध्ये लपण्याची वेळ
- लाहोरमधील हल्ल्यांनी लाज काढली
- पाक सैन्यप्रमुखावरच देशद्रोहाचा खटला
- बलुचिस्तानने पाकिस्तानच्या 3 भागांवर कब्जा केला
- बलुचिस्तानातील चौक्या सोडून पळून जाण्याची वेळ
आणखी वाचा






















